बापरे, ओमायक्रॉनमुळे पुन्हा कोरोना होण्याचे प्रमाण डेल्टाच्या तुलनेत तिप्पट

Omicron Pandemic : ओमायक्रॉनमुळे पुन्हा कोरोना होण्याचं प्रमाण डेल्टाच्या तुलनेत तिप्पट असल्याचे पुढे आले आहे. 

Updated: Dec 3, 2021, 01:48 PM IST
बापरे, ओमायक्रॉनमुळे पुन्हा कोरोना होण्याचे प्रमाण डेल्टाच्या तुलनेत तिप्पट title=
संग्रहित छाया

वॉशिंग्टन : Omicron Pandemic : ओमायक्रॉनमुळे पुन्हा कोरोना होण्याचं प्रमाण डेल्टाच्या तुलनेत तिप्पट असल्याचे पुढे आले आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या संशोधकांचा हा प्राथमिक अहवाल आहे. (  Omicron More Dangerous than Delta )

ओमायक्रॉनचा धोका वाढू लागला आहे. आतापर्यंत 31 देशात ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे. 31 देशात ओमायक्रॉनचे 376 रुग्ण सापडले आहेत. ग्रीसमध्येही ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून पतली होती. तसेच सौदी अरेबियातही ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.

ओमायक्रॉन हा खतरनाक धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण डेल्टाच्या तुलनेत तिप्पट आहे. त्यामुळे तो किती धोकादायक आहे, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेतल्या संशोधकांनी हा प्राथमिक अहवाल दिला आहे. विशेष म्हणजे कोरोना झाल्यावर तयार होणाऱ्या रोगप्रतिकाशक्तीलाही ओमायक्रॉन विषाणू जुमानत नसल्याचे या अहवालात दिसून आले आहे.