अमेरिकेचा इशारा धुडकावून उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉम्बची चाचणी

अमेरिकेनं दिलेला इशारा धुडकावून उत्तर कोरियानं हायड्रोजन बॉम्बची चाचणी केलीये.

Updated: Sep 3, 2017, 05:12 PM IST
अमेरिकेचा इशारा धुडकावून उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉम्बची चाचणी title=

सेऊल : अमेरिकेनं दिलेला इशारा धुडकावून उत्तर कोरियानं हायड्रोजन बॉम्बची चाचणी केलीये. भूकंपासंदर्भात माहिती देणा-या संस्थांकडून उत्तर कोरियाच्या मुख्य अणुचाचणी केंद्राजवळ ६.३ तिव्रतेच्या स्फोटाची नोंद करण्यात आलीये.

उत्तर कोरियानं केलेल्या पाचव्या अणुचाचणीपेक्षा या हायड्रोन बॉ़म्बची तीव्रता ९.८ पट अधीक आहे. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राद्वारे मारा करता येईल असा हायड्रोजन बॉम्ब उत्तर कोरियानं विकसित केल्याचा दावा प्योंगयांग यांनी केलाय. यापूर्वी केलेल्या अणूचाचण्यांमुळे संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय समूहाने उत्तर कोरियावर निर्बंध घातले होते.