मुंबई : विविध क्षेत्रातील संशोधनासाठी सध्या नोबेल पुरस्कारांच्या घोषणा केल्या जात आहेत. रॉयल स्विडिश अकॅडमीकडून आज रसायन शास्त्रातील नोबेलची घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार अमेरिका, ब्रिटन आणि जपानमधील तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात येणार आहे. लिथिअम-आयन बॅटरीच्या संशोधनासाठी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
जॉन बी. गुडइनफ, एम. स्टॅनली व्हायटिंघम आणि अकिरा योशिनो अशी या तीन नोबेल पुरस्कार जाहीर झालेल्या रसायन शास्त्रज्ञांची नावे आहेत. 97 वर्षांचे गुडइनफ हे या पुरस्काराला जिंकणारे सर्वात पहिले ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. लिथिअम-आयन बॅटरीमुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या विश्वात क्रांती झाली आहे. या बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणावरील ऊर्जा छोट्या स्वरुपात साठवून ठेवता येते. या बॅटरीच्या संशोधनामुळे कार, लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे हे पोर्टेबल झाली आहेत.
The 2019 #NobelPrize in Chemistry has been awarded to John B. Goodenough, M. Stanley Whittingham and Akira Yoshino “for the development of lithium-ion batteries.” pic.twitter.com/LUKTeFhUbg
— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2019
नोबेल समितीने या पुरस्काराबाबत म्हटले की, १९७० मधील तेल संकट हे लिथिअम-आयन बॅटरीच्या संशोधनाचे मूळ आहे. तेव्हा व्हायटिंघम यांनी जीवाश्म इंधनमुक्त ऊर्जा निर्माण करण्याचे तंत्र विकसित करण्याचे ध्येय ठेवले होते. या बॅटरीने आपल्या जीवनात क्रांती आणली आहे.
Watch the very moment the 2019 Nobel Prize in Chemistry is announced.
Presented by Göran K. Hansson, Secretary General of The Royal Swedish Academy of Sciences.#NobelPrize pic.twitter.com/PM8X2S3Zy4
— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2019
९ लाख १८ हजार अमेरिकन डॉलर म्हणजे 7.40 करोड रुपये, एक गोल्ड मेडल असे रसायन शास्त्रातील नोबेल पुरस्काराचे स्वरुप आहे. १० डिसेंबर रोजी नॉर्वेतील स्टॉकहोम आणि ओस्लो येथे हे नोबेल पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.