ह्युस्टनचे एनआरजी स्टेडियम मोदीमय; मोदींच्या भाषणाची उत्सुकता

मोदींच्या सभेच्या ठिकाणी उत्साहाचे वातावरण

Updated: Sep 22, 2019, 09:04 PM IST
ह्युस्टनचे एनआरजी स्टेडियम मोदीमय; मोदींच्या भाषणाची उत्सुकता title=

ह्युस्टन, अमेरिका : ह्युस्टनमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीयांना संबोधीत करणार आहेत. ह्युस्टनचे एनआरजी (NRG) स्टेडियम सध्या मोदीमय झाले आहे. या कार्यक्रमासाठी ह्युस्टनमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. 

ह्युस्टनमधील हाऊडी मोदी कार्यक्रमाची प्रचंड उत्सुकता आहे. भारतीय वंशाचे अनेक लोक मोदींच्या कार्यक्रमासाठी, त्यांना ऐकण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभेच्या ठिकाणी उत्साहाचे वातावरण आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातल्या ह्युस्टन शहरात आज 'हाऊडी मोदी' हा मेगा शो होत आहे. या निमित्ताने मोदींच्या स्वागताच्या छायाचित्रांनी पूर्ण ह्युस्टन शहर सजले आहे. या कार्यक्रमाला तब्बल ५० हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत. हाऊडी मोदी कार्यक्रमात मोदी काय बोलतात याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 

काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे अमेरिकेतले काश्मिरी पंडित खास टीशर्ट घालून मोदींच्या या सभेत सहभागी होणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठ्या जल्लोषात ह्युस्टनमध्ये स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी प्रथमच सात दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहे. ह्युस्टनमध्ये आगमन झाल्यानंतर शीख समाज, बोहरा मुस्लिम समाज आणि काश्मिरी पंडितांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. स्वच्छता अभियानापासून चांद्रयान दोन पर्यंतच्या कामाचे यावेळी कौतुक करण्यात आले. काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्याबद्दलही काश्मिरी पंडितांनी मोदींचे आभार मानले.