मलेशियाचे आठवे पंतप्रधानपदी मुहायदीन यासिन, घेतली शपथ

मलेशियाचे  (Malaysia) नवे पंतप्रधान म्हणून आज कट्टर मुस्लिम राष्ट्रवादी मुहायदीन यासिन (Muhyiddin Yassin) यांनी शपथ घेतली. 

Updated: Mar 2, 2020, 09:50 AM IST
मलेशियाचे आठवे पंतप्रधानपदी मुहायदीन यासिन, घेतली शपथ  title=

क्वालालंपूर : मलेशियाचे  (Malaysia) नवे पंतप्रधान म्हणून आज कट्टर मुस्लिम राष्ट्रवादी मुहायदीन यासिन (Muhyiddin Yassin) यांनी शपथ घेतली. महाथीर महंमद यांचे सरकार कोसळल्यानंतर मलेशियाच्या राजांनी यासिन यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली होती. यासिन यांनी देशाचं अर्थमंत्रीपद सांभाळले होते. 

मलेशियाचे माजी गृहमंत्री (Muhyiddin Yassin) यांनी रविवारी मलेशियाचे आठवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. झिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या  माहितीनुसार, २४ फेब्रुवारी रोजी महाथिर मोहम्मद यांनी राजीनामा दिल्यानंतर मुहिद्दीन यांना पंतप्रधान केले गेले. २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीपासूनच महाथिर हे पदावर होते.

मुहिद्दीन यांच्या शपथविधीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यांनी पारंपारिक मलय कपडे घातले होते आणि राष्ट्रीय पॅलेसमध्ये मलेशियाचा राजा सुल्तान अब्दुल्ला सुलतान अहमद शाह यांच्यासमोर त्यांनी देशाची आणि लोकांची सेवा करण्याचा संकल्प केला.

या समारंभात मुहिद्दीनचे राजकीय सहकारी सहभागी झाले होते. ७२ वर्षीय मुहिद्दीन यांनी २००९ ते २०१५ पर्यंत माजी पंतप्रधान नजीब रझाक यांच्या सरकारमध्ये उपपंतप्रधान म्हणून काम केले. त्यांनी महातीर यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून काम पाहिले.

0