धक्कादायक ! या देशात 500 हून अधिक महिलांवर बलात्कार, शेजारील देशाच्या सैनिकांवर आरोप

पुरुषांसमोर त्यांच्या कुटुंबातील महिलांवर बलात्कार

Updated: Mar 28, 2021, 03:26 PM IST
धक्कादायक ! या देशात 500 हून अधिक महिलांवर बलात्कार, शेजारील देशाच्या सैनिकांवर आरोप title=

नवी दिल्ली : आफ्रिकन देश इथिओपियाच्या तिग्रे भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलांवर बलात्काराच्या 500 हून अधिक घटना घडल्या आहेत. पुरुषांसमोर त्यांच्या कुटुंबातील महिलांवर बलात्कार केला गेला. संयुक्त राष्ट्रसंघाने (यूएन) म्हटले आहे की सामूहिक बलात्काराच्या घटनांची वास्तविक संख्या आणखी जास्त असू शकते.

इथिओपियातील यूएनच्या वतीने सहाय्यक समन्वयक वाफा यांनी न्यूयॉर्कमध्ये सांगितले की, "पीडित महिलांनी म्हटलं की त्यांच्यावर सशस्त्र पुरुषांनी बलात्कार केला." अनेक महिलांनी सामूहिक बलात्कार, कुटुंबातील सदस्यांसमोर बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी देऊन कुटुंबातील सदस्यांसमोर बलात्काराची कहाणीही सांगितली आहे. ते म्हणाले की,  Mekelle, Adigrat, Wukro, Shire आणि Axum या  medical वैद्यकीय सुविधा केंद्रांवर बलात्काराचे 516 प्रकरण आले आहेत.

वाफा म्हणाले की, 'बलात्काराच्या घटनेमुळे बदनामी होईल या भीतीने अनेक महिला समोर देखील आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत वास्तविक संख्या यापेक्षा अधिक असू शकते असा अंदाज आहे.' सोमवारी संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत तिगरे येथील लोकांवर होणारा गोळीबार आणि बलात्कार लक्ष्यित हल्ले संपवण्याची मागणी केली गेली. संयुक्त राष्ट्रांनी अत्याचारांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्याचवेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी हे एखाद्या समुदायाला नष्ट करण्याचं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. पण इथिओपियाने ब्लिंकेनचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.

शेजारील देश Eritrea च्या सैनिकांवर आरोप

मीडिया रिपोर्टनुसार तिगरे (Tigray) येथे राहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की ही लूट आणि अत्याचार शेजारील देश इरिट्रियाच्या सैनिकांनी केले आहेत. ते म्हणाले की, इरिट्रियाचे सैनिक दररोज त्यांची घरे जाळत आहेत. त्यांच्या महिलांवर सामूहिक बलात्कार केले जात असून पिकांना आग लावल्या जात आहेत.