Modi Laoxian: चिनी लोकांनी मोदींना दिलं टोपणनाव! अर्थ जाणून तुम्हालाही वाटेल अभिमान

Chinese Netizens Nickname to Indian PM: चीनमधील तरुणाईने अशाप्रकारे देशाबाहेरील आणि त्यातही शत्रू राष्ट्राच्या नेत्याला एखादं टोपणनाव देणं ही फारच दुर्मिळ गोष्ट असल्याचं या लेखामध्ये नमूद करण्यात आलं असून मोदींबद्दल चिनी लोकांना काय वाटतं हे ही सांगितलं आहे.

Updated: Mar 20, 2023, 08:40 PM IST
Modi Laoxian: चिनी लोकांनी मोदींना दिलं टोपणनाव! अर्थ जाणून तुम्हालाही वाटेल अभिमान title=
Chinese People Says Modi Laoxian

Chinese Netizens says Modi Laoxian: अमेरिकेतील अंतरराष्ट्रीय न्यूज मॅक्झिन 'डिप्लोमॅट'मधील एका वृत्तानुसार चीनमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे प्रचंड लोकप्रिय आहेत. ही लोकप्रियता इतकी आहे की येथील चिनी नेटकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना एक टोपणनाव दिलं आहे. हे टोपण नाव आहे 'मोदी लाओक्सियन'! (Modi Laoxian) आता या लाओक्सियनचा अर्थ आहे 'अमर आहेत.' म्हणजेच मोदी हे अमर असल्याचं संबोधत चिनी नेटकरी त्यांच्याबद्दल चर्चा करतात. दोन्ही देशांमध्ये मागील बऱ्याच काळापासून सीमावाद सुरु असताना शत्रू राष्ट्राच्या प्रमुख नेत्याबद्दल देशात एवढी क्रेझ असण्याचा प्रकार चीनमध्ये् फार क्वचित घडतो. त्यातही अशा नेत्याबद्दल सकारात्मक दृष्टीकोनातून माहिती मिळवण्याचा चिनी नेटकऱ्यांचा प्रयत्न हा सर्वांनाच गोंधळात टाकणार आहे.

भारत समतोल राखू शकतो

राजकीय विश्लेषणासाठी लोकप्रिय असलेल्या 'डिप्लोमॅट'ने 'चीनमध्ये भारताकडे कसं पाहिलं जातं?' अशा मथळ्याखाली पत्रकार म्यू चुनशान यांनी एक लेख लिहिला आहे. यात त्यांनी बहुतांश चिनी लोक असं मानतात की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर प्रमुख देशांमध्ये संतुलन कायम ठेवण्याचं काम नीट करु शकतो. चुनशान हे चीनमधील सोशल मीडिया आणि खास करुन चिनी ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिना वेइबोचं विश्लेषण करणाऱ्या तज्ज्ञांपैकी एक आहेत. सिना वेइबोवर चीनमधील 58.2 कोटी युझर्स आहेत.

'मोदी लाओक्सियन'चा अर्थ काय?

"चीनमधील इंटरनेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल फार चर्चा होते. ही चर्चा मोदी लाओक्सियन नावाने होते. लाओक्सियनचा संदर्भ काही विशेष क्षमता असणारी एक वयस्कर अमर व्यक्ती असा लावता येईल. या टोपणनावाचा अर्थ असा आहे की चीनमध्ये इंटरनेट वापरणारे लोक असा विचार करतात की मोदी हे इतर नेत्यांच्या तुलनेत वेगळे आणि आश्चर्यात टाकणारे नेते आहेत," असं चुनशान यांनी लेखात म्हटलं आहे. चुनशान यांनी मोदींचे कपडे आणि देहबोलीकडे लक्ष वेधताना त्यांची धोरणं ही भारताच्या आधीच्या धोरणांपेक्षा वेगळी असल्याचं मानतात. 

मोदींबद्दल जाणून घेण्यास उत्सुक

चिनीमधील अनेक नेटकऱ्यांचं असं म्हणणं आहे की, भारत, रशिया, अमेरिकेसहीत अन्य वेगवेगळ्या प्रमुख देशांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेऊ शकतो. त्यांचं म्हणणं आहे की 'लाओक्सियन' शब्द मोदींबद्दल चिनी लोकांमध्ये असलेली भावना दर्शवतो. यामध्ये प्रामुख्याने मोदींबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा तसेच मोदींबद्ल वाटणारं आश्चर्य यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. 

मोदींनी सोडली छाप

चुनशान यांनी, "मी मागील 20 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणासंदर्भात वृत्तांकन करत आहे. तसेच चिनी नेटकऱ्यांकडून परदेशी नेत्याला असं एखादं टोपणनाव दिलं जाणं हे फार दुर्मिळ आहे. मोदींना देण्यात आलेलं टोपणनाव हे या सर्वांमध्ये वरच्या स्थानावर आहे. मोदींनी चिनी लोकांवर छाप नक्कीच सोडली आहे," असंही लेखात म्हटलं आहे.