17 मिनिटात डॉक्टरांचा असा चमत्कार आणि 7 वर्षांच्या मृत मुलात जीव ओतला

एका आईवर आपल्या पोटच्या मुलाला कायमची गमावण्याची वेळ आली होती. मात्र डॉक्टरांमुळे आई-लेकाची ताटातूट होण्यापासून वाचली. 

Updated: Nov 2, 2022, 06:42 PM IST
17 मिनिटात डॉक्टरांचा असा चमत्कार आणि 7 वर्षांच्या मृत मुलात जीव ओतला title=

मुंबई : डॉक्टरांनी ( Doctors) कोरोना (Corona) काळात आपल्या जावीचा पर्वा न करता दिवसरात्र रुग्णांची सेवा केली. डॉक्टरांना देवाचा दर्जा का दिला जातो या वाक्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. दवा की नही अब दुआ की जरुरत है, हे वाक्य आपण अनेकदा सिनेमात ऐकलंय. मात्र यावेळेस जो काही चमत्कार (Miracle) झालाय तो सिनेमापेक्षा कमी नाही.

एका आईवर आपल्या पोटच्या मुलाला कायमची गमावण्याची वेळ आली होती. मात्र डॉक्टरांमुळे आई-लेकाची ताटातूट होण्यापासून वाचली. हा सर्व प्रकार महिलेच्या अकाळी प्रसुतीदरम्यान (Preterm Delivery)घडला.  या मुलाचा जन्म (New Born Baby) अपेक्षित वेळेच्या 10 आठवड्यांआधी झाला. प्रसुती झाल्यानंतर या चिमुरड्याला तब्बल 17 मिनिटं श्वास घेता आला नाही. त्यामुळे कुटुंबियांवर वाईट वेळ ओढावली होती. 

या चिमुरड्याला श्वास घेता यावा यासाठी डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. मात्र दुसऱ्या बाजूला कुटुंबियांची रडून वाईट अवस्था झाली. डॉक्टरांनी त्या चिमुरड्याला वाचवण्यासाठी लॅबमध्ये घेऊन गेले. शक्य ते उपचार (Treatment) करायला सुरुवात केली आणि चमत्कार झाला. चिमुरडा श्वास घ्यायला लागला आणि रडायला लागला. या 3 महिन्यांच्या चिमुरड्याला रुग्णालयात ठेवण्यात आलंय. 

असा झाला चमत्कार

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे चिमुरड्याला जीवनदान मिळालं. या चिमुरड्याची प्रकृती फार नाजूक होती. चिमुरड्याला सुदृढ करण्यासाठी रक्त चढवण्यात आलं. डॉक्टरांनी सूचना देत चिमुरड्याला ऑक्सिजन सपोर्टवर कुटुंबियांकडे सोपवलंय. हा चमत्कार ब्रिटनमध्ये घडलाय.