स्पेन (माड्रीड) : अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कंपनी McAfee संस्थापक जॉन मॅकॅफीचा मृतदेह बुधवारी स्पॅनिश तुरुंगात सापडला. कोर्टाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कोर्टाने मॅकॅफीला अमेरिकेला जाण्यासाठी मंजुरी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या बॅरेकमध्ये सापडला. खरे तर मॅकॅफीवर अमेरिकेत टॅक्स चोरी केल्याचा आरोप आहे. त्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती.
जेलच्या प्रवक्त्याने सांगितले की, 75 वर्षीय मॅकॅफीने आत्महत्या केली असावी. या व्यतिरिक्त प्रवक्त्यांनी इतर कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे मॅकॅफी यांचा मृत्यू कसा झाला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
ऑक्टोबर 2020 मध्ये मॅकॅफीला बार्सिलोना विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो बार्सिलोनामधून इस्तांबुलला पळून जाणार होता. परंतु पोलिसांनी पकडल्यानंतर त्याला स्पेनच्या तुरुंगातात बंधिस्त करणात आले आहे.
मॅकॅफीवर 2014 ते 2018 दरम्यानचा टॅक्स जाणीवपूर्वक भरला नसल्याचा आरोप केला आहे. मॅकॅफीला दोषी ठरवण्यात आले असते, तर त्याला किमान 30 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली गेली असती.
बुधवारी स्पॅनिश कोर्टाने मॅकॅफीला अमेरिकेत घेऊन जाण्यास मान्यता दिली होती. परंतु या निर्णयाला आव्हान दिले जाऊ शकत होते. परंतु त्या आधीच मॅकॅफीचा मृत्यू झाला.