कहर! निवडणूक लढण्यासाठी पैसे हवेत म्हणून नेता विकणार स्वत:चे अश्लील फोटो

To Be Mayor To Sell Nude Photos For Funds: आपल्याला निधी उभारण्याची मोहीम ही रस्त्यावरुन सोशल मीडियावर न्यायची असल्याचं या नेत्याने सांगितलं असून त्याअंतर्गतच तो हे फोटो पोस्ट करुन निधी उभा करणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 10, 2023, 11:29 AM IST
कहर! निवडणूक लढण्यासाठी पैसे हवेत म्हणून नेता विकणार स्वत:चे अश्लील फोटो title=
नग्नावस्थेतील फोटोही आपण पोस्ट करणार असल्याचं त्याने जाहीर केलं आहे (फोटो - इन्स्टाग्रामवरुन साभार))

To Be Mayor To Sell Nude Photos For Funds: निवडणूक लढणं हे काही सर्वसमान्यांच्या कामं नाही असं म्हटलं जातं. यामागील मुख्य कारण म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी लागणारा पैसा. वेळेत पैसे मिळाले नाही किंवा कमी पडले तर प्रचारात अडचण निर्माण होऊन पराभव होण्याची शक्यता अधिक असते असं म्हटलं जातं. त्यामुळेच निवडणूक लढवण्यासाठी पुरेसा पैसा आपल्याकडे असावा म्हणून सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारही वेगवेगळ्या मार्गाने निवडणुकींआधी निधी बाजूला काढून ठेवतात. मात्र कोलंबियामधील एका तरुण नेत्याने निवडणूक लढण्यासाठी आवश्यक निधी जमवण्यासाठी फारच वेगळा मार्ग निवडला असून सध्या त्याची देशभरामध्ये चर्चा आहे.

कोण आहे ही व्यक्ती?

कोलंबियामधील टर्बो नावाच्या शहरामध्ये महापौरपदाची निवडणूक होणार आहे. याच निवडणुकीमध्ये क्रिस्टियन मेस्त्रे (Cristian Mestre) सुद्धा आपलं नशीब आजमावात आहे. मात्र क्रिस्टियनने ही निवडणूक लढवण्यासाठी पैसा गोळा करण्याचा मार्ग अवलंबला आहे. क्रिस्टियनने आपले खासगी फोटोंची विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त 'डेली स्टार'ने दिलं आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये अशाप्रकारे उमेदवार स्वत:चे खासगी फोटो विकून निवडणुकीचा निधी उभारण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे.

वेगळ्या माध्यमातून उभा करणार पैसा

खरं तर नेते, अभिनेते आणि खेळाडूंच्या आयुष्यातील अनेक गोष्टींची सार्वजनिक आयुष्यात चर्चा होताना दिसते. मात्र अशा परिस्थितीमध्येही हे सेलिब्रिटी आपलं खासगी आयुष्य जपण्याचा प्रयत्न करतात. मात्र याबद्दल क्रिस्टियनची भूमिका वेगळी आहे. टर्बो शहरातील महापौर होण्यासाठी क्रिस्टियनने कंबर कसली असून ही निवडणूक ऑक्टोबरमध्ये असली तरी तो आतापासूनच तयारीला लागला आहे. यापूर्वी क्रिस्टियनने शेजारच्याच अॅण्टीक्विया नगरपालिकेमध्ये वित्त सचिव म्हणून काम केलं आहे. याच अनुभवाच्या जोरावर क्रिस्टियनला आता महापौरपदाची निवडणूक लढायची आहे. ही निवडणूक लढवण्यासाठी आपण व्यापाऱ्यांची मदत घेण्याऐवजी आपण लोकांमधून वेगळ्या माध्यमातून पैसा उभा करु असा विश्वास क्रिस्टियनने व्यक्त केला आहे. मात्र लोकांमधून पैसा उभा करण्याचा मार्ग फारच हटके आहे.

न्यूड फोटोही करणार पोस्ट

क्रिस्टियनने निवडणुकीसाठी पैसा उभा करण्यासाठी लवकरच ओन्ली फॅन्सवर आपण खातं सुरु करत आहोत असं जाहीर केलं आहे. 89 रुपये मोजून या साईटवर क्रिस्टियन यांच्या फोटो, व्हिडीओंसाठी सबस्क्रीब्शन घेता येणार आहे. ओन्ली फॅन्स ही अश्लील कंटेटसाठी ओळखली जाणारी साईट आहे. या साईटवर लॉगइनसाठी आणि अश्लील, अर्धनग्न, नग्न फोटो पाहण्यासाठी पैसे मोजावे लागतात. असा स्वत:चे असेच काही फोटो पोस्ट करुन पैसे कमवण्याचा क्रिस्टियनचा विचार आहे. मी पैसे उभी करण्याची मोहीम रस्त्यावरुन सोशल मीडियावर नेणार आहे. म्हणून मी ओन्ली फॅन्सवर येण्याचा निर्णय घेतला आहे, असं क्रिस्टियनने म्हटलं आहे. क्रिस्टियन या साईटवर आपले अनेक खासगी फोटो पोस्ट करणार असून त्यामध्ये न्यूड फोटोंचाही समावेश असणार आहे. हे फोटो क्रिएटीव्ह पद्धतीने पोस्ट केले जाणार असून त्याबरोबर राजकीय मेसेजही पोस्ट केला जाईल, असं सांगण्यात आलं आहे.