मुंबई : फेसबूकचे सीईओ मार्क झुकरबर्ग कँब्रिज अनॉलिटीक डेटा लीक प्रकरणात यूएस काँग्रेस समोर हजर झाला. त्याने विश्वास दिला की भारतात होणाऱ्या आगामी निवडणुका फेसबूकच्या माध्यमातून प्रभावित नाही होऊ देणार. सोशल मीडियात आघाडीवर असलेल्या फेसबूकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गवर फेसबूक खासगी माहितीचा गैरवापर केलाचा आरोप ठेवण्यात आला होता.
फेसबूकच्या जवळपास ८ कोटी खातेदारांची खासगी माहिती निवडणुकीसाठी दिली. त्यामुळे त्याच्यावर जगभरातून टीका होऊ लागली. याप्रकरणी त्याने माफीही मागतली. आमची मोठी चूक झाली, माफ करा. दरम्यान, मार्क झुकेरबर्गची अमेरिकी काँग्रेससमोर सुनावणी झाली. आम्ही आमची सामूहिक जबाबदारी ओळखली नाही, ही आमची मोठी चूक झाली. त्याबाबत मी दिलगीरी व्यक्त करत आहे. फेसबूक खातेदार वापरत असलेल्या अॅपमधून त्यांची माहिती घेतली गेली. यात आम्ही काहीच केले नाही. यातून पुढे खोटया बातम्या, निवडणुकीत हस्तक्षेप, द्वेषमूलक वक्तव्ये यासारखे अनेक परिणाम झाले, असे तो म्हणाला.
झुकरबर्गने म्हटलं की २०१८ हे महत्त्वाचं वर्ष आहे. अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होणार आहेत. सोबतच भारत, पाकिस्तान, ब्राझील सारख्या देशांमध्ये देखील निवडणुका होणार आहेत. मी विश्वास देतो की निवडणुकीवर फेसबुकचा काहीही परिणाम होणार आहे. झुकरबर्गने 2018 मध्ये होणाऱ्या निवडणुकीबाबतीत एक पोस्ट लिहिली होती. त्याने म्हटलं की, या प्रकरणात अनेक पाऊलं उचलली गेली आणि यापुढे ही पाऊलं उचलली जातील. झुकरबर्गने कॅम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरणात आपली चूक मान्य केली.
After the 2016 election (US elections), our top priority was protecting the integrity of other elections around the world: Mark Zuckerberg, CEO, Facebook pic.twitter.com/3tjTFQq8Kx
— ANI (@ANI) April 10, 2018
यूएस काँग्रेस समोर झुकरबर्गने माफी मागितली. 'फेसबूकला मी बनवलं आणि मीच त्याला चालवतो. त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे. माझ्याकडून चूक झाली. मला माफ करा' असं देखील त्याने म्हटलं.