मुंबई : 4 वर्षाच्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचं तु्म्ही कधी ऐकलं नसेल. तुम्ही देखील ही गोष्ट ऐकून हैराण झाला असाल. पण जगात एक असं न्यायालय देखील आहे. ज्याने 4 वर्षाच्या बालकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मंसूर कुरानी अली असं या मुलीचं नाव आहे. या लहान मुलावर अतिशय गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जगातील इतर कोणतंही न्यायालय कदाचित हे मान्य देखील नाही करणार की या बालकावर इतके गंभीर आरोप झाले आहेत. पण जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा अनेकांना धक्का बसला.
हे प्रकरण इजिप्तमधील आहे. येथे एका कोर्टाने मुलाला 4 लोकांची हत्या आणि 8 लोकांना जीवे मारण्याच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील या मुलावर करण्यात आला. हे प्रकरण जेव्हा देशासमोर आलं तेव्हा देशभरातून लोकांनी याला विरोध केला. लोकांनी रस्त्यापासून सोशल मीडियापर्यंत कोर्टाच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. येवढंच नव्हे तर मोठ्या मोठ्य़ा तज्ज्ञांनी देखील यावर आपलं मत मांडलं. 1 वर्ष हे प्रकरण कोर्टामध्ये चालत राहिलं.
जेव्हा हे प्रकरण वैश्विक स्तरावर आलं तेव्हा इजिप्तच्या न्यायालयावर टीका होऊ लागली. त्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा गांभीर्याने घेतलं आणि पुन्हा चौकशीचे आदेश दिले. पण जेव्हा पुन्हा चौकशी झाली तेव्हा या प्रकरणा मागचं वेगळंच सत्य़ बाहेर आलं. ज्याने अनेकांना धक्का बसला. कारण ज्या आरोपाखाली मंसूरला 1 वर्ष तुरुंगात होता तो गुन्हा त्याने केलाच नव्हता. जे आरोप मंसूरवर लावण्यात आले होते त्याची चौकशीच झाली नव्हती. चौकशी न करताच न्यायालयाने त्या मुलाला शिक्षा सुनावली होती. पुन्हा चौकशी झाल्यानंतर मंसूरची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर इजिप्तच्या या कोर्टाने मान्य केलं की, 4 वर्षाच्या या मुलाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा देऊन मोठी चूक केली.
मंसूरला इजिप्त कोर्टाने 2014 च्या दंगलीमध्ये सहभाग असलेल्या 115 अन्य आरोपींच्या यादीत दोषी ठरवलं होतं. पण जो गुन्हा त्याने केलाच नाही त्यासाठी त्याला 1 वर्ष तुरुंगात जावं लागलं. यानंतर कोर्टाने मंसूरच्या पित्याची माफी मागितली.