शिकागो : कॅन्सरशी झुंज देत असलेल्या ९ वर्षांच्या मुलाने या गंभीर आजारावर एकदा नाही तर दोनदा मात केली आहे. यासाठी त्याचा ७ वर्ष संघर्ष चालू होता. ही घटना आहे अमेरिकेतल्या शिकागो येथील. २०१० मध्ये या मुलाला 'न्यूरोब्लास्टोमा' म्हणजेच नर्व्ह सेल्सचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. उपचारादरमान्य किमोथेरपी देखील करण्यात आली. परंतु, त्यामुळे मुलाची ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. मात्र आता तो मुलगा पूर्णपणे स्वस्थ आहे.
२०१० मध्ये डॉक्टरांनी मुलाच्या वाचण्याचे शक्यता फक्त ३०% असल्याचे सांगितले होते. उपचार सुरु झाल्यानंतर पोटातून ट्युमर काढण्यात आला. नंतर किमोथेरपी सुरु करण्यात आली. किमोथेरपीमुळे कॅन्सरवर उपचार झाले असले तरी त्याचा परिणाम कानांवर झाला.
मात्र इथेच त्याची परीक्षा संपली नव्हती. सुमारे ६ महिन्यांनंतर कॅन्सरने पुन्हा डोके वर काढले. त्यावर लियामने पुन्हा एकदा विजय मिळवला. परंतु, त्याची ऐकण्याची क्षमता पूर्णपणे नाहीशी झाली. त्यानंतर डॉक्टरांच्या एका टीमने एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लावून कॉक्लियर इंप्लांट केले. सुमारे ७ वर्षानंतर लियामने पहिल्यांदा आपल्या आईचा आवाज ऐकला आणि तो आनंदाने भारावून गेला.