प्रसिद्ध गायकाला 13 वर्षाचा तूरूंगवास, मुलींना घरी बोलावून करायचा...

बापरे! प्रसिद्ध गायकाला सुनावला 13 वर्षांचा तुरूंगवास, पण नेमका गुन्हा काय केलाय? वाचा 

Updated: Nov 25, 2022, 10:48 PM IST
प्रसिद्ध गायकाला 13 वर्षाचा तूरूंगवास, मुलींना घरी बोलावून करायचा... title=

एका 32 वर्षीय प्रसिद्ध गायकाला 13 वर्षांच्या तूरूंगवासाची (13 years imprisonment) शिक्षा सुनावण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लैंगिक गुन्ह्यात दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने त्याला ही शिक्षा सुनावली. या घटनेने मोठी खळवळ उडवून दिली आहे. तसेच गायकाच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.  

चीनी-कॅनडियन पॉप गायक क्रिस वू (Kris Wu) ला तीन महिलांवर बलात्कार आणि सामूहिक लैंगिक कृत्यांसाठी दोषी ठरवले होते. या गुन्ह्यात तो दोषी आढळल्यानंतर त्याला 13 वर्षांच्या तुरुंगवासाची (13 years imprisonment) शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीजिंगच्या एका न्यायालयाने त्याला ही शिक्षा सुनावलीय.  

घटनाक्रम काय?

बीजिंगच्या चाओयांग जिल्ह्यातील न्यायालयाने शुक्रवारी क्रिस वूला (Kris Wu) 3 महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी 11 वर्षे आणि सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. 2020 मध्ये दारूच्या नशेत असताना आणि स्वतःचा बचाव करू शकल्या नसताना तीनही महिलांना आपल्या घरी बोलावून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप सिंगरवर आहे. न्यायालयाने पुढे सांगितले की, याशिवाय सिंगरला सामूहिक लैंगिक कृत्यांसाठी लोकांना एकत्र केल्याबद्दल एक वर्ष 10 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मुलींचे आरोप काय आहेत?

क्रिस वूवर (Kris Wu) प्रथम डू मीझू नावाच्या विद्यार्थ्याने आरोप केले होते. मुलीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे सांगितले होते की, ती दोन वर्षांपूर्वी वूला भेटली होती. तेव्हा मुलीचे वय 17 वर्षे होते. मुलीच्या म्हणण्यानुसार, तिला सिंगरच्या घरी आयोजित पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. येथे तिला जबरदस्तीने दारू पाजण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली तेव्हा ती सिंगरच्या बेडवर होती.

दरम्यान गेल्या वर्षी क्रिस वू ला  (Kris Wu) पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी एका विद्यार्थिनीने त्यांच्यावर डेट-रेपचा आरोप केला होता. यानंतर आणखी 24 मुली पुढे आल्या आणि त्यांनी वू विरोधात साक्ष दिली होता. आता त्याला 13 वर्षांच्या तूरूंगवासाची (13 years imprisonment) शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे.