1009 वेळा अपयश पचवणाऱ्या या व्यक्तीनं 65 व्या वर्षी जग जिंकलं

 एखादी व्यक्ती किती वेळा अयशस्वी होऊ शकते? 10 वेळा, 20 वेळा की 100 वेळा...? 

Updated: Nov 4, 2021, 10:12 PM IST
1009 वेळा अपयश पचवणाऱ्या या व्यक्तीनं 65 व्या वर्षी जग जिंकलं title=

मुंबई : एखादी व्यक्ती किती वेळा अयशस्वी होऊ शकते? 10 वेळा, 20 वेळा की 100 वेळा...? एवढ्या वेळा अपयशी होऊनही कोणीही व्यक्ती तुटत नाही अशी उदाहरणे क्वचितच पाहायला मिळतात. असच एक उदाहरण म्हणजे KFC चे संस्थापक colonel Harland Sanders, जे 1009 वेळा निराश झाले. ज्या वयात लोक निवृत्ती घेतात, त्याच वयात त्यांच्या करिअरची सुरुवात झाली वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी KFC सुरू केलं. colonel Harland Sanders यांना एकामागून एक अपयश कशी येत गेली आणि मग एके दिवशी कसं त्यांचं नशीब चमकलं हे जाणून घेऊया.

वयाच्या ७ व्या वर्षी चांगले 'कुक' बनले
colonel Harland Sanders यांचा जन्म 1890 मध्ये हेन्रीविले, इंडियाना, USAमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं निधन त्यांच्या वयाच्या ६ व्या वर्षी  झालं. जेव्हा घरची परिस्थिती बिकट झाली तेव्हा आई एका कारखान्यात काम करू लागली आणि colonel Harland Sanders आपल्या लहान भावंडांची काळजी घेवू लागले. वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी ते चांगला स्वयंपाक करायला शिकले. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांच्या आईचं दुसरं लग्न झालं. त्याच्या सावत्र वडिलांना ते आवडत नव्हते त्यामुळे ते आपल्या मावशीसोबत राहू लागले. आणि शेतात काम करु लागले. colonel Harland Sanders त्यावेळी सातवीत शिकत होते आणि त्यांनी  त्याच वर्षी शिक्षण सोडलं.

आयुष्यात अनेक छोट्या छोट्या गोष्टी केल्या
त्यानंतर ते सगळ्या प्रकारची कामे करत राहिले. सैन्यात भरती झाले, मात्र तिथूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली. काही काळ रेल्वेत नोकरी केली. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. रेल्वेत नोकरी करत असताना काही वादामुळे त्यांनी रेल्वेची नोकरी सोडली. त्यानंतर त्यांची पत्नीही मुलांसोबत त्यांच्यापासून विभक्त झाली. त्यांनी आयुष्यात इतरही अनेक छोट्या छोट्या गोष्टी केल्या. कधी विमा विकला तर कधी क्रेडिट कार्ड विकलं. टायर विकणं, दिवे बनवणं  यातही त्यांनी हात आजमावला. तरीही त्यांना कुठेच यश मिळत नव्हतं. 

1930 मध्ये सँडर्स यांचं आयुष्य पुन्हा रुळावर आलं. जेव्हा त्यांनी कॉर्बिन, केंटकी ईथे गॅस स्टेशन विकत घेतलं. अनेक प्रवाशांनी त्यांना रेस्टॉरंटही उघडण्यास सांगितलं. लहानपणापासूनच त्यांना कुकिंगची  आवड होती. अशा परिस्थितीत त्यांनी रेस्टॉरंटमध्ये सगळ्या प्रकारच्या खास रेसिपीसह चिकन विकण्यास सुरुवात केली. हे पाहताच त्यांचे काम चालले आणि त्यांना मोठा फायदा होऊ लागला.1950 मध्ये एके दिवशी केंटकीचे गव्हर्नर तिथे आले होते. colonel Harland Sanders यांच्या हातचं चिकन खाल्लं आणि त्यांला ते खूप आवडलं. मग काय, त्यांनी हार्लँड सँडर्स यांना कर्नल ही पदवी दिली आणि तेव्हापासून ते कर्नल सँडर्स म्हणून ओळखले जातात. कर्नल ही पदवी देशाची अत्यंत प्रतिष्ठित पदवी मानली जाते.

colonel Harland Sanders यांचं रेस्टॉरंट हायवेवर होतं,  रेस्टॉरंट हायवे बाहेर पडल्यामुळे एकेदिवशी त्यांचं रेस्टॉरंट तोडलं गेलं. यानंतर त्यांच्या संघर्षाची दुसरी फेरी सुरू झाली. त्यांनी विचार केला की त्यांची रेसिपी रेस्टॉरंटला का देऊ नये आणि विक्रीवर नफा मिळवावा. या विचाराने ते सगळ्या रेस्टॉरंटमध्ये गेले आणि त्यांच्या तळलेल्या चिकनची रेसिपी विकण्यासाठी डील करू लागले. ते कुठेही गेले तरी त्यांच्या पदरात निराशा येत होती. त्यांना 1009 वेळा 'नाही' ऐकावं लागलं. यानंतर त्यांना पहिला 'हो' ऐकायला मिळाला आणि इथून केएफसीच्या यशाचा प्रवास सुरू झाला.

वयाच्या ६५ व्या वर्षी  केएफसीची सुरुवात झाली
colonel Harland Sanders यांना एका रेस्टॉरंटमधून होकार मिळाल्यावर त्यांनी तिथे आपलं चिकन विकायला सुरुवात केली आणि नफ्यावर थोडा नफा घ्यायला सुरुवात केली. ते रेस्टॉरंटमध्ये मसाल्यांची पाकिटं पाठवत असत.  ज्यामुळे त्यांची रेसिपी सुगम राहिली आणि त्याच वेळी लोकांना उत्तम चवही मिळाली. इथून केएफसी प्रसिद्ध होऊ लागलं. त्यानंतर ऑक्टोबर 1963 मध्ये, एक वकील जॉन वाय. ब्राउन ज्युनियर आणि उद्योगपती जॅक सी. मॅसी यांनी colonel Harland Sanders भेट घेतली आणि केएफसीचे मताधिकार अधिकार विकत घेण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, पण नंतर जानेवारी 1965 मध्ये त्यांनी 2 दशलक्ष डॉलर्सला अधिकार विकले.

करारानुसार, KFC  फ्राइड चिकन कंपनी जगभरात स्वतःचे रेस्टॉरंट तयार करेल आणि गुणवत्तेशी कधीही तडजोड करणार नाही याची पुष्टी करण्यात आली. colonel Harland Sanders आयुष्यभर $ 40,000 पगार देण्याचा करारही झाला. नंतर त्यांचा पगार 75,000 डॉलर करण्यात आला. यानंतर त्यांची कंपनी रेनॉल्ड्स आणि पेप्सिकोसह अनेकांच्या हातात गेली आणि सध्या या कंपनीची मालकी 'यम ब्रँड्स कॉर्पोरेशन'कडे आहे. colonel Harland Sanders यांचे 1980 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. colonel Harland Sanders  आज या जगात नाहीत, पण KFC वर खास दाढी आणि वेस्टर्न टाय असलेला त्यांचा चेहरा अजूनही KFC चिकन खाणाऱ्यांना विसरु देत नाही. आज, KFC ची 150 पेक्षा जास्त देशांमध्ये 22,000 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.