बिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत!

 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटले की आपल्या समोर कदाचित बिल गेट्स यांचे नाव येईल.

Updated: Mar 7, 2018, 01:06 PM IST
बिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत! title=

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटले की आपल्या समोर कदाचित बिल गेट्स यांचे नाव येईल. असे जर असेल तर तुमचा अंदाज चुकीचा आहे. कारण बिझनेस मॅगझिन फोर्ब्सतर्फे २०१८ च्या श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर झाली आहे. यात पहिल्या स्थानावर अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस आहेत. फोर्ब्सनुसार जेफ बेजोस यांची एकूण संपत्ती सुमारे १२७ अरब डॉलर आहे. तर भारतातील श्रीमंत व्यावसायिक म्हणून ओळख असलेल्या मुकेश अंबांनींचे नाव या यादीत पहिल्या दहात नाही.

अॅमेझॉनच्या कमाईत जबरदस्त वाढ

जेफ बेजोस हे ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांच्या या श्रीमंतीचे रहस्य म्हणजे अॅमेझॉनच्या कमाईत झालेली जबरदस्त वाढ हे आहे. अॅमेझॉनची बाजारातील किंमत सुमारे ७२७ अरब डॉलर आहे. १० वर्षांपूर्वी ही किंमत २७ अरब डॉलर इतकी होती. गेल्या काही वर्षात ई-कॉमर्सच्या जगात झालेली प्रचंड उलाढाल आणि वाढ यामुळे कंपनीची किंमत चक्क इतकी वाढली आहे. याचा अर्थ १० वर्षात अॅमेझॉनची मार्केट व्हॅल्यू २७% वाढली आहे. 

बिल गेट्स दुसऱ्या स्थानावर

फोर्ब्सच्या धनाढ्यांच्या यादीत बिल गेट्स दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ९० बिलियन डॉलर आहे. तर तिसऱ्या स्थानावर वारेन बफेट आहे. बर्कशायर हाथवेचे सीईओ वारेन बफेट यांची एकूण संपत्ती ८७ बिलियन डॉलर आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग या यादीत ५ व्या स्थानावर आहे. त्यांची एकूण मालमत्ता ७२ बिलियन डॉलरची आहे.

मुकेश अंबानी टॉप १० मध्ये नाहीत

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती ४० बिलियन डॉलर असून या यादीत त्यांना १९ वे स्थान मिळाले आहे.