का नाही आहे अफगाणिस्तानात एक पण भारतीय सैनिक....

  अफगाणिस्तानात आपले सैनिक न पाठविण्याचा निर्णय भारताने पाकिस्तानला असलेल्या भीतीमुळे आहे, या भागात नवीन पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी स्पष्ट केले आहे. 

Updated: Oct 5, 2017, 07:48 PM IST
 का नाही आहे अफगाणिस्तानात एक पण भारतीय सैनिक.... title=

वॉशिंग्टन :  अफगाणिस्तानात आपले सैनिक न पाठविण्याचा निर्णय भारताने पाकिस्तानला असलेल्या भीतीमुळे आहे, या भागात नवीन पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी स्पष्ट केले आहे. 

मॅटिसने सशस्त्र सेवा समितीमध्ये समोर युद्धग्रस्त अफगाणिस्तानला भारत करत असलेल्या मदतीची प्रशंसा केली.  अफगाणिस्तानच्या मदतीसाठी भारताने सकारात्मक भूमिका घेतली आहे. पण अफगाणिस्तानमध्ये भारतीय सैनिक तैनात केल्याने या परिसरात नवीन पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो.