इस्त्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू, 18 हजार भारतीय अडकले

इस्रायल - हमासमध्ये गेल्या दोन दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. आत्तापर्यंत दोन्ही बाजूंचे जवळपास 1200 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या युद्धात आता अमेरिकेची एट्री झालीय. अमेरिकन विमानवाहू युद्धनौकाही इस्रायलच्या मदतीला पोहोचल्या आहेत.

राजीव कासले | Updated: Oct 9, 2023, 06:44 PM IST
इस्त्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू, 18 हजार भारतीय अडकले title=

Israel-Hamas War : इस्रायल, हमास यांच्यातील युद्ध आणखी तीव्र झालाय. गेले दोन दिवस सुरु असलेल्या युद्धात आतापर्यंत जवळपास 1200 जणांचा मृत्यू झालाय. हमासनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायल सैन्यानेही गाझा पट्टीतील हमासच्या अड्ड्यांना लक्ष्य केलं आहे. या युद्धात हिज्बुल (Hizbullah) या दहशतवादी संघटनेनं एन्ट्री करत इस्रायलवर हवाई हल्ले केले. गाझा पट्टीतून (Gaza) हमास आणि लेबेनॉनच्या सीमेकडून हिज्बुल्लाह असे हल्ले सुरू झाल्यामुळे इस्रायल एकाचवेळी दोन फ्रंटवर लढाई लढतोय. दोन्ही बाजूंचे आत्तापर्यंत 1200 हून अधिक लोक ठार झालेत असा दावा करण्यात येतोय. सैनिकांसह नागरिकांचा बळीही मोठ्या प्रमाणात जात आहे. तर हजारो लोक जखमी झालेत. इस्रायल हमास युद्धाचे पडसाद अमेरिकेत उमटलेत. वॉशिंग्टन शहरात इस्रायल समर्थक आणि हमास समर्थक आपआपसात भिडले.

युद्धात अमेरिकेची एंट्री
इस्रायल आणि हमासमधल्या युद्धात (Israel Hamas War) आता अमेरिकेने (Amrica) मोठा निर्णय घेतलाय. अमेरिका इस्रायलच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. अमेरिकेने इस्रायलच्या मदतीसाठी आपली विमानवाहू युद्धनौका जेराल्ड फोर्ड रवाना केलीय. जेराल्ड फोर्डच्या 5 युद्धनौकांचा समावेश असलेला स्ट्राईक ग्रुपसुद्धा मदतीसाठी रवाना झालाय. युद्धनौकांचा हा स्ट्राईक ग्रुप इस्रायलच्या मदतीसाठी तैनात करण्यात येणार आहे. या विमानवाहू युद्धनौकेवर लढाई विमानं तसंच मिसाईल यंत्रणा आहे.. तसंच इस्रायलजवळच्या प्रदेशात अमेरिकेच्या एअर फोर्सची  F-35, F-15, F-16, आणि A-10 ही लढाऊ विमाने तैनात करण्यात येणार आहे..

इस्त्रायलमध्ये भारतीय अडकले
इस्रायल, हमास युद्धात इस्रायलमध्ये 18 हजार भारतीय (Indian Stuck in Israel) अडकलेत. भारतीय नागरिक दुतावासाच्या संपर्कात आहेत आणि ते सुखरुप असल्याचं समजतं. या युद्धात अनेक परदेशी नागरिक ठार झाले असल्याची माहिती भारतातील इस्रायलचे राजदूत नोर गिलोन यांनी दिलीय. मात्र, ठार झालेल्या परदेशी नागरिकांमध्ये भारतीयांचा उल्लेख नाही. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय अधिकारी, पर्यटक, व्यापाऱ्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत.

सुरक्षा परिषदेने घेतली दखल
इस्रायल हमास युद्धाची गंभीर दखल संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनेही घेतलीय. सुरक्षा परिषदेने तातडीची बैठक घेत, हमासच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केलाय. हमास आणि आयसीसमध्ये कोणताही फरक नाही असं इस्रायलच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत म्हटलंय. हमासवर संयुक्त राष्ट्रांनी एकत्रित कारवाई करावी अशी मागणी अमेरिकेने केली. मात्र ही मागणी सुरक्षा परिषदेने अमान्य केलीय.