विंडोजच्या 'या' जगप्रसिद्धी फोटोची जन्मकहाणी माहीत आहे?

विंडोजचा हा 'ब्लिस' फोटो खरा आहे?

Updated: Oct 31, 2019, 12:12 PM IST
विंडोजच्या 'या' जगप्रसिद्धी फोटोची जन्मकहाणी माहीत आहे? title=
संग्रहित छायाचित्र

कॅलिफोर्निया : दैनंदिन जीवनातील अनेक कामं सुकर करणारा संगणकहा मानवाचा मित्रच झाला आहे. विविध कारणांसाठी गेल्या काही वर्षांमध्ये संगणकाचा वापर वाढला आहे. त्यातही सातत्याने बदलणारं तंत्रज्ञानामुळे तर हा मित्र जास्तच जवळचा. असा हा मित्ररुपी संगणक, दैनंदिन वापराच्या भाषेत म्हणावं तर, हा कॉम्प्युटर सुरू केल्यानंतर अनेकांच्या डेस्कस्टॉपवर एक सुंदर निसर्गचित्र दिसतं. 

वारंवार दिसणारं हे निसर्गचित्र पाहिल्यानंतर असं कोणतं ठिकाण अस्तित्वात असेल का? हा प्रश्नही पडला आहे. याविषयी अनेकांना वाटलं असेल फोटो काढलेलं ठिकाण काल्पनिक असावं किवा ती अॅनिमेशनची कमाल असावी. पण तुम्हाला माहिती आहे का, हे ठिकाण अस्तित्वात आहे. 

हे छायाचित्र अमेरिकेतले प्रसिद्ध फोटोग्राफर चार्ल्स  ओरिअर यांनी काढलं आहे. तेसुद्धा ही अगदी साध्या कॅमेऱ्यानं. चार्ल्स हे आपल्या कारनं कॅलिफोर्नियात निघाले होते. वाटेत सोनोमा कंट्रीजवळ आल्यानंतर त्यांनी सहज कारबाहेर पाहिलं. तेव्हा समोरचा हिरवागार डोंगर त्यांच्या नजरेत भरला. निळं आकाश आणि त्यावरचे पांढरे शुभ्र ढग पाहून त्यांच्यातल्या फोटोग्राफरला तो फोटो शूटसाठी उत्तम अँगल वाटला. त्यांच्याकडं हाय रेझ्युलेशनचा कॅमेरा नव्हता. त्यांनी असलेल्या साध्या कॅमेऱ्यानं पटापट चार पाच फोटो काढले.

हा फोटो खाडणारे चार्ल्स ओरिअर म्हणाले होते, 'मी फोटोसाठी कॅमेरा तयार केला. तोपर्यंत आकाशात एक ढग आला. तोपर्यंत मी कॅमेऱ्याचा क्रॅंक फिरवला. तोपर्यंत ढग गेला होता. मी एक फोटो काढला. त्यानंतर आणखी चार फोटो काढले. काम फत्ते झालं आणि मी कॅमेरा बंद केला'.

फोटो टीपल्यानंतर जेव्हा त्यांनी फोटोची प्रिंट काढली तेव्हा त्यांना त्यांच्याच डोळ्यांवर विश्वास बसला नाही. कारण, त्यांचा हा फोटो मायक्रोसॉफ्टच्या एका अधिकाऱ्याला खूप आवडला. त्यांनी हा फोटो बिल गेट्सना दाखवला. गेट्स यांनी हा फोटो त्यांच्या विंडो एक्सपीच्या लॉचिंगसाठी निवडला. २००१मध्ये मायक्रोसॉफ्टच्या विंडोज एक्सपीच्या लॉन्चिंगवेळी या फोटोला डेस्कस्टॉप फोटोचा बहुमान मिळाला. 

ओरिअर यांनी टीपलेल्य़ा या फोटोला तुफान पसंती मिळाल्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या जाहिरात मोहिमेतही या फोटोचा वापर झाला. जेव्हा लोकांना हा फोटो सोनोमा कंट्रीतील असल्याचं कळलं तेव्हा त्यांनी या ठिकाणी गर्दी करत तेथे फोटो टीपण्यास सुरुवात केली. पण त्या डोंगरावर तसा फोटो पुन्हा कधीच काढता आला नाही. या फोटोनं चार्ल्स यांना अमाप प्रसिद्धी आणि पैसाही दिला. १९९६मध्ये दिसलेल्या निसर्गाच्या त्या छटा पुन्हा कधीच दिसल्या नाहीत त्यामुळे छायाचित्रकारासोबतच हा निसर्गाचाही अदभूत चमत्कारच म्हणावा लागेल.