Two Sun Seen In The Sky: अचानक आकाशात दोन सूर्यांचे दर्शन झाल्यास तुमची काय प्रतिक्रिया असेल. असाच एक दुर्लभ क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या त आकाशात एकाचवेळी दोन सूर्य दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, एकाचवेळी दोन सूर्य कसे दिसू शकतात यावर विश्वास ठेवणे अनेकांना कठिण जात आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
तुम्हाला तर माहितीच आहे. सूर्य सौरमंडळाच्या केंद्रस्थानी आहे. तर, सौरमंडळातील अनुक्रमेनुसार सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी आहे. सूर्य हा पृथ्वीवासियांचा जीवनदाता आहे. सर्व जीवसृष्टीचे पालनपोषण त्याच्यामुळं होतं. पृथ्वीवरुन सहजपणे सूर्य पाहता येतो. पण अंतराळात एकच सूर्य आहे. जगातील कोणत्याही कोपऱ्यातून बघितल्यास सूर्य एकच दिसेल. मात्र, प्रत्येक ठिकाणानुसार त्याचा रंगात फरक जाणवू शकतो. सूर्योदय आणि सूर्यास्त होतानाचा सूर्याचा रंग वेगळा जाणवू शकतो. मात्र सूर्य एकच आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओत दोन सूर्य दिसत आहेत. पण हे कसं शक्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकतो का, समुद्रात तरंगत असलेल्या एका जहाजातून हा व्हिडीओ घेण्यात आला आहे. दोन सूर्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. आकाशात पहिला सूर्य चमकत असल्याचे दिसत आहे तर, एक सूर्य ढगांच्या आड लपला आहे. हा अद्भूत नजारा पाहून युजर्सही आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकांनी कमेंट करुन हे कसं शक्य आहे असं विचारलं आहे.
व्हिडीओवर कलेल्या एका कमेंटनुसार व्हिडिओत दिसणाऱ्या दोन सूर्यांपैकी एक खरखरचा सूर्य आहे तर एक चंद्र आहे. हा एक निसर्गाचा चमत्कार आहे. कधी कधी निसर्गही ही चमत्कार दाखवतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
दरम्यान, यापूर्वीही 2016 मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये दोन सूर्य दिसल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, तेव्हाही त्यातील एक सूर्य हा चंद्र होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ bluebookreptilian नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला होता. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहण्यात आलं होतं की, तुम्ही या दोन सूर्य असलेल्या व्हिडीओबाबत काय विचार करताय?.