'या' देशांमध्ये अद्याप पोहोचला नाहीय कोरोना

 जगातील काही भागांमध्ये अद्याप कोरोनाची केस समोर आली नाही. 

Updated: Nov 13, 2020, 11:21 PM IST
'या' देशांमध्ये अद्याप पोहोचला नाहीय कोरोना  title=

वेलिंगटन : अर्जेंटीनापासून झिम्बॉम्बेपर्यंत आणि वेटिकनपासून व्हाइट हाऊसपर्यंत कोरोना व्हायरसने सर्वांना आपलं शिकार बनवलं. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे प्रत्येक महाद्वीप आणि जवळजवळ सर्वच देश डबघाईत गेलेयत. पण जगातील काही भागांमध्ये अद्याप कोरोनाची केस समोर आली नाही. यामध्ये खरंच काहीजण संक्रमणापासून वाचलेयत तर काहीजण यामागची सत्यता लपवत असल्याचे म्हटलं जातंय. 

दक्षिण प्रशांत महासागरातील काही द्वीप यामध्ये मोडतात. टोंगा,  किराबाती, सामोआ, माइक्रोनेशिया आणि तुवालु छोटे द्वीपीय देश आहेत जिथे कोरोनाची एकही केस समोर आली नाही. 

कोरोना केस नसतानाही लॉकडाऊन 

मार्च महिन्यापासूनच देशाने क्रूज जहाजांना तटापासून दूर ठेवले आणि हवाई अड्डे बंद केले असे टोंगाच्या चेंबर ऑफ कॉमर्स (Chambers of commerce) आणि इंडस्ट्रीचे अध्यक्ष पाऊला टाऊमोइपियाऊ यांनी म्हटले.

सध्या कोरोना केसचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर लोकांना येऊ दिले जात आहे. टोंगाची पूर्ण लोकसंख्या साधारण १ लाख आहे.