Imran Khan : गुरू इम्रान खान यांच्यावर गोळीबार, शोएब अख्तरला संताप अनावर, Video शेअर करत म्हणाला...

Former pakistani PM Imran Khan : इम्रान खान यांना गुरू मानणाऱ्या शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) देखील प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाला "इम्रान भाईवर झालेल्या हल्ल्याबद्दल...."

Updated: Nov 3, 2022, 09:17 PM IST
Imran Khan : गुरू इम्रान खान यांच्यावर गोळीबार, शोएब अख्तरला संताप अनावर, Video शेअर करत म्हणाला... title=

Shoaib Akhtar on Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर गुजरानवालामधील रॅलीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात इम्रान खान जखमी असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यानंतर पाकिस्तानात एकच गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. इम्रान खान यांच्या पायाला जखम झाल्याचं समजतंय. इम्रान खान यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर पाकिस्तानात अनेकांनी संताप व्यक्त केलाय. तर दुसरीकडे इम्रान खान यांना गुरू मानणाऱ्या शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) देखील प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला शोएब अख्तर?

इम्रान भाईवर झालेल्या हल्ल्याबद्दल ऐकलं. तो आता बरा आहे आणि अल्लाहने त्याला सुरक्षित ठेवलंय. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. हे कृत्य कोणी केलं असेल..., या देशात या गोष्टी थांबल्या पाहिजेत. वाईट बातमी ऐकण्यासाठी हृदय पुरेसं मजबूत नाही. अल्लाह आपल्या देशाचं रक्षण करो. सगळा ड्रामा थांबला पाहिजे, काही निष्कर्षापर्यंत पोहोचले पाहिजे, असं शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने म्हटलं आहे.

आणखी वाचा - Imran Khan Firing : मोठी बातमी : इम्रान खान यांच्यावर गोळीबार

इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील वजीराबाद भागात रॉली (Imran Khan shot at during rally) काढली होती. त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानात संतापाची लाट उसळली आहे.  त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता आधीच वर्तविण्यात येत होती. त्यानंतर आता पाकिस्तानात राजकीय अराजकता दिसून येत आहे.

पाहा व्हिडीओ - 

दरम्यान, गोळीबारात इम्रान खान यांच्या खंदे समर्थकाचा मृत्यू झालाय. त्याचबरोबर आणखी 7 सहकारी जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं आणि पोलिसांनी विचारपूस केली. त्यानंतर त्याने कबुली दिली आहे. इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानच नव्हे तर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.