पीओकेच्या नागरिकांना इम्रान खान म्हणाले, 'सीमारेषा पार केलात तर भारत....'

 काश्मीरी जनतेचा हा संघर्ष इस्लामिक दहशतवाद ठरवला जात असल्याचे ते म्हणाले. 

Updated: Oct 5, 2019, 12:20 PM IST
पीओकेच्या नागरिकांना इम्रान खान म्हणाले, 'सीमारेषा पार केलात तर भारत....' title=

इस्लामाबाद : काश्मीरी जनतेच्या आंदोलनाला भारतातर्फे इस्लामिक दहशतवाद ठरवले जात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. जम्मू आणि काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्याच्या निर्णयाला साठ दिवस पूर्ण झाले आहेत. यासंदर्भात इम्रान खान यांनी एक ट्वीट केले आहे. काश्मीरी जनतेचा हा संघर्ष इस्लामिक दहशतवाद ठरवला जात असल्याचे ते म्हणाले. 

 Imran Khan says, struggle for the rights of Kashmiris is trying to label it as Islamic terrorism

जम्मू आणि काश्मीरमध्ये २ महिन्याहून अधिक काळ कर्फ्यू आहे. काश्मीरच्या जनतेचा आक्रोश मी समजू शकतो. पण कोणीही सीमारेषा पार केली तर तो भारताच्या कटामध्ये अडकेल असेही ते म्हणाले. 

इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही जम्मू काश्मीरचा मुद्दा समोर आणत भारतावर निशाणा साधला. यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. आपला देश आणि त्यातील समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुन इम्रान खान काश्मीर मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. जम्मू आणि काश्मीरातील कर्फ्यू हटल्यावर तिथे रक्तपात होईल. तेव्हा तिथे काय होईल ? याचा विचार केला आहे का ? असा प्रश्न इम्रान खान यांनी उपस्थित केला.