न्यूयॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद मुद्द्यावर पुन्हा एकदा आपला कबुलीजबाब दिला आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे प्रशिक्षण होत असल्याची कबुली त्यांनी विदेशी वृत्तवाहीनीला दिली. पाकिस्तानात ५० दहशतवादी ग्रुप होते असेही ते म्हणाले. दरम्यान ९/११ दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आणि अमेरिकेशी मैत्री संबधांनंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात मोर्चा उघडला.
१९८० च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये तत्कालिन सोवियत संघाने रशियन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी मुजाहिदीनचे प्रशिक्षण पाकिस्तानने दिले होते. त्यांना जिहाद करण्यासाठी तयार केले गेले. पण ९/११ दहशतवादी हल्ल्यानंतर मुजाहिदीन अमेरिकेसोबत पाकिस्तानाचेही शत्रू बनले. गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा इम्रान खान यांनी हे स्वीकारले आहे. रशियन माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी हे म्हटले होते.
पाकिस्तानी सैन्य आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने अफगाणिस्तानमध्ये लढण्यासाठी अलकायदा आणि इतर दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण दिले होते. ते प्रशिक्षित असल्याने त्यांच्याशी संबंध बनवल्याचेही इम्रान खान यांनी कबुल केले.