'एएन ३२' विमानाची माहिती देणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस जाहीर

वायु दलाकडून या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. 

Updated: Jun 9, 2019, 01:30 PM IST
'एएन ३२' विमानाची माहिती देणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस जाहीर  title=

नवी दिल्ली : वायु दलाच्या 'एएन ३२' या आसाममधून बेपत्ता झालेल्या मालवाहू विमानाचा अद्यापही शोध लागलेला नाही. आता या विमानाची माहिती देणाऱ्याला पाच लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. वायु दलाकडून या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. ३ जून रोजी उड्डाणानंतर काही वेळात भारतीय वायु दलाचे 'एएन ३२' हे विमान आसाममध्ये चीनच्या हद्दीजवळ बेपत्ता झाले होते. या विमानात आठ कर्मचारी आणि पाच जवान आहेत. हे विमान आसाममधील जोरहाटमधून अरुणाचल प्रदेशात जात होते. दुपारी १२.२५ वाजता या विमानाने उड्डाण केले होते. 

'एएन ३२' हे विमान अरुणाचल प्रदेशातल्या मेचुका विमान तळावर दुपारी दीड वाजता पोहोचणे अपेक्षित होते. मात्र विमानतळावरील कर्मचाऱ्यांचा त्याच्याशी दुपारी १ वाजता शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर हे विमान गायब आहे. विमात १३ जण आहेत, आणि गेल्या सहा दिवसांपासून हे विमान बेपत्ता आहेत. शनिवारी भारतीय वायुसेनेकडून माहिती देणाऱ्याला ५ लाख रूपये जाहीर करण्यात आले आहे.

'एअर मार्शल आर. डी. माथूर, एओसी इन कमांड, इस्टर्न एअर कमांड यांनी या बेपत्ता विमानाची माहिती सांगणाऱ्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.' विंग कमांडर रत्नाकर यांनी ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून सांगितली आहे.