लंडनमध्ये भर चौकात मानवी मांस विक्रीला

रस्त्याच्या मधोमध रक्ताने माखलेल्या प्लास्टीकखाली मुलींचं शव दिसत होतं, या शवाचं मास खरेदी करण्याचं आवाहन काही लोक करत होते.

Updated: Aug 27, 2017, 08:26 PM IST
लंडनमध्ये भर चौकात मानवी मांस विक्रीला title=

लंडन : लंडनच्या ट्रायफेल्गर स्क्वेअरला सर्व लंडनकर आपल्या कामात व्यस्त होते, तेव्हा अचानाक गर्दीची नजर लोकांमध्ये माणसाचं मास विकणाऱ्यांवर गेली. रस्त्याच्या मधोमध रक्ताने माखलेल्या प्लास्टीकखाली मुलींचं शव दिसत होतं, या शवाचं मास खरेदी करण्याचं आवाहन काही लोक करत होते.

लंडनच्या रस्त्यावर बिकीनी घातलेल्या मुली रस्त्यावर पडलेल्या होत्या, रक्ताने शरीर माखलेल्या या मुली प्लास्टिकने झाकलेल्या होत्या, एखादं शव झाकल्यासारखं. हे दृश्य पाहून लोक हैराण होत होते. मुलींच्या शरीरावर मानवी मटण असल्याचं लेबल लावण्यात आलं होतं.

खरं तर हे लोक  स्पेसिएसिस्मचा विरोध करत होते, काही मुलींनी जमिनीवर पडून प्रदर्शन केलं. स्पेसिएसिस्म म्हणजे प्राण्यांचं जीवनही अनमोल आहे, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. याकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केलं, तसेच जनावरांनाही जगण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. लोकांना त्यांनी शाकाहारी होण्याचं आवाहन केलं, कारण मटणसाठी प्राण्यांचे जीव घेतला जातो.