मोठी बातमी... काबूलवर सकाळी जोरदार रॉकेट हल्ला

सतत होत असलेल्या हल्लांमुळे अफगाण नागरिकांमध्ये भीती   

Updated: Aug 30, 2021, 08:47 AM IST
मोठी बातमी... काबूलवर सकाळी जोरदार रॉकेट हल्ला title=

काबूल : अफगाणिस्तानमध्ये तलिबानची सत्ता स्थापन झाल्यापासून रोज धक्कादायक बातम्या समोर येत आहे. सध्या काबूल विमानतळाजवळ सतत बॉम्बस्फोट घडवून आणले जात आहेत. सोमवारी सकाळी काबूल पुन्हा रॉकेट हल्ल्याने हादरले आहेत. आता याठिकाणी अनेक  रॉकेट हल्ले झाल्याची माहिती  मिळत आहे. हवाई हल्ला आहे किंवा बॉम्बस्फोट याची अद्याप पुष्टी केलेली नाही. आता काबूलमध्ये चार ठिकाणी हल्ले झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एका वृत्तसंस्थेच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काबूलमध्ये अनेक रॉकेटचे आवाज ऐकायला आहे. पण या हल्ल्यामागे त्यांचे लक्ष्य काय आहे हे स्पष्ट झाले नाही. सद्यस्थिती पाहाता आफगाणिस्तानमध्ये अत्यंत चिंचाजनक परिस्थिती आहे. या हल्ल्याआधी देखील काबूल विमानतळावर प्राणघातक हल्ले झाले. 

या हल्ल्यामध्ये  अनेक अनेरिके सैन्य, अफगाणि नागरिक आणि तालिबानींचा समावेश आहे. रविवारी अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाजवळ रॉकेट टाकण्यात आला. हा रॉकेट हल्ला एअरपोर्टच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य मार्गापासून 800 मीटर ते 1किलोमीटर अंतरावर झाला आहे. या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत.

 मृत आणि जखमी झालेल्यांमध्ये महिलांचा आणि लहान मुलांचा समावेश आहे, अंस प्रत्यक्षदर्शीचं म्हणंनं आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार या हल्ल्यामागे आयएसआयएस  (ISIS)  या दहशतवादी संघटनेचं हात असण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.