Chimpanzee Heartwarming Viral Video: एक दिवस नुसतं घरात बसलं किंवा पावसाळ्यात सूर्य दिसला नाही तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मानवी शरिराला किंवा कोणत्याही सजीव गोष्टीला सूर्यप्रकाशाची आणि मोकळ्या हवेची गरज असते. अशातच एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ पाहून तुमचं देखील हृदय पिळवटल्याशिवाय रहाणार नाही. एका भयानक प्रयोगशाळेच्या प्रयोगातून वाचलेल्या चिंपांझीचा हा व्हिडिओ आहे.
अमेरिकेत चिंपांझीला तब्बल 29 वर्ष लॅबमध्ये कोंडून ठेवलं होतं. नुकतंच, जेव्हा त्यानं पहिल्यांदा बाहेरचं जग पाहिलं, मोकळं आकाश पाहिलं (chimpanzee sees sky first time viral video), तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तो भावूक झाल्याचं दिसून आलं. अशातच त्या चिंपांझीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. मनुष्याला वाटतं की तो सर्वात शक्तिशाली आहे, म्हणून तो नेहमी प्राण्यांना काबूत ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
आणखी वाचा - रात्री 2 वाजता घरात बिबट्याची एन्ट्री अन्...; धक्कादायक CCTV व्हिडिओ व्हायरल!
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, मादी चिंपांझीला न्यूयॉर्कमधील प्रयोगशाळेत मागील 2 वर्षांसाठी ठेवण्यात आलं होतं. त्यापूर्वी कॅलिफोर्नियातील प्रयोगशाळेत चिंपांझीला बंद खोलीत ठेवण्यात आलं होतं. तब्बल 29 वर्षानंतर चिंपाझीला मोकळ्या आकाशाखाली सोडण्यात आलंय. निसर्गातील सान्निध्य पाहण्याची संधी मिळाली. गेल्या वर्षी व्हॅनिलासह इतर काही चिंपांझींना फ्लोरिडातील सेव्ह द चिंप्स अभयारण्यात आणण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्यांना मोकळ्या हवेत बागडण्यासाठी सोडण्यात आलंय.
Imagine being 29 years old and seeing the sky for the first time.
“Vanilla the chimp, caged for entire life, sees sky for first time . . .”#VanillaTheChimp pic.twitter.com/4dniXuqUr4
— Acadius (@Acadius) June 27, 2023
दरम्यान, चिंपांझीने पहिल्यांदा आकाश पाहिलं तेव्हा तो भावूक आणि खूप उत्साही असल्याचं दिसून आलं. इतर चिंपांझीने त्याला सोबत घेतलं आणि परिसर फिरवला. काही कॅमेरामॅन चिंपाझीची रिअॅक्शन कैद करण्यासाठी उत्सुक होते. त्यावेळी कोणा एका फोटोग्राफरने तो क्षण कॅमेऱ्यात टिपला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये असून नेटकरी मोठ्या प्रमाणात व्हिडिओ शेअर करत असल्याचं दिसतंय.