Guinness World Records : जगात अशी अनेक लोकं असतात, जी आपल्या कामगिरीने सर्वांना दखल घ्यायला भाग पाडतात. याच कामगिरीची दखल गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही (Guinness World Records) घेतली जाते. आता यात आणखी एका नावाची नोंद झाली आहे. 20 वर्षांच्या एका तरुणाला सर्वात कमी उंचीचा (Short Hight) पुरस्कार दिला गेला आहे. अफशिन इस्माइल घादेरजादेह (Afshin Esmaeil Ghaderzadeh) या तरुणाची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अफशिनची उंची केवळ 2 दोन फूट 1 इंच आहे. तर वजन 6.5 किलो इतकं आहे. इराणचा (Iran) नागरिक असलेला अफशिनला मोबाईल सारखी लहान वस्तूही वापरणंही अवघड जातं.
अफशिनला मदतीची गरज
अफशिनचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा त्याचं वजन अवघं 700 ग्राम इतकंच होतं. इराणच्या अजरबैजान प्रोविंसमधल्या बुकान काऊंटी इथं अफशिन लहानाचा मोठा झाला. त्यांची उंची 2 दोन फूट 1 इंच इतकी आहे. गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर अफशिनला जगभरातून मदतीची अपेक्षा आहे. त्याला आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत, पण उंचीमुळे त्याला कुठे नोकरीही मिळत नाही.
अफशिनने मोडला रेकॉर्ड
याआधी कोलंबियातील एडवर्ड हर्नांडेज (Edward Nino Hernandez) नावाच्या व्यक्तीची जगातील कमी उंचीचा पुरुष म्हणून नोंद झाली होती. 36 वर्षांच्या एडवर्डची उंची 2.7 इंच इतकी आहे. पण आता अफशिनने त्याचाही रेकॉर्ड मोडला आहे. कमी उंची आणि कमी वजनामुळे अफशिन तब्येतीने खूपच नाजूक आहे. त्यामुळे तो शाळेतही जाऊ शकला नाही.
मोबाईल वापरणं ही बनलंय अवघड
अफशिनला आपल्या कमी वजनामुळे अनेक दैनंदिन कामं करणंही अवघड बनलंय. इतकंच काय तर त्याला फार काळ मोबाईलही (Mobile) उचलून धरता येत नाही. शारीरिक कमजोरीमुळे अफशिन इच्छा असूनही शिकून शकला नाही, पण तो मानिसकदृष्ट्या स्वस्थ असल्याचं त्याच्या वडिलांनी म्हटलं आहे.
तीन वर्षांच्या मुलांचे कपडे
अफशिनला थोडंफार लिहिता वाचता येतं. त्याच्या वयाचे कपडे मिळत नसल्याने अफशिनला वीसाव्या वर्षात तीन वर्षांच्या मुलांचे कपडे वापरावे लागतात. अफशिनला कार्टुन बघायला आवडतं. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर @mohamadghaderzadeh_official या नावाने अकाऊंट सुरु केलं आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे एडिटर इन चीफ क्रेग ग्लेंडे यांनी अफशिन आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. गिनीज रेकॉर्डमध्ये नाव आल्यानंतर अफशिन आता सेलिब्रेटी बनल्याचं त्यांनी सांगितलं. दुबईतल्या बुर्ज खलीफा इमारतीच्या टॉपवर जाण्याची अफशिनची इच्छा आहे.