कोलंबो : श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाने माजी संरक्षण सचिव गोताबाया राजपक्षे यांना रविवारी अध्यक्षीय निवडणुकीत विजयी घोषित केले. राजपक्षे यांना ५२.२५ टक्के मते मिळाली, तर त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी आणि सरकारचे मंत्री साजित प्रेमदास यांना ४१.९९ टक्के मते मिळाली, असे निवडणूक आयोगाने सांगितले. दरम्यान, प्रेमदास यांनी यापूर्वीच पराभव स्वीकारला आहे.
प्राचीन उत्तर मध्य शहर अनुराधपुरा येथील रुवानवेली सेया भागात गोताबाया राजपक्षे यांनी काल श्रीलंकेचे सातवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. नवनिर्वाचित ७० वर्षीय अध्यक्ष राजपक्षे यांनी ५२ वर्षीय साजित प्रेमदास यांना १३ लाखाहून अधिक मतांनी पराभूत केले, अशी माहिती निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केली.
ईस्टर संडेच्या भीषण दहशतवादी हल्ल्यात जवळपास २५० लोक मृत्युमुखी पडले होते. सात महिन्यांनंतर श्रीलंकेत राष्ट्राध्यपदाची निवडणूत झाली. शनिवारी पार पडलेल्या मतदानात ८० टक्के पात्र मतदारांनी आपल हक्क बजावला होता. त्यामुळे नवा राष्ट्राध्यक्ष कोण होईल याची उत्सुकता होती. या निवडणुकीत एकूण ३५ उमेदवार रिंगणात होते. मात्र थेट लढत गोताबाया राजपक्षे आणि साजिथ प्रेमदास यांच्यात होते आहे. मात्र विद्यमान राष्ट्राध्यक्ष ही निवडणूक लढवली नाही.