ज्यू नेत्यांचा आक्षेप...तरीही इतक्या कोटींना हिटलरच्या घडयाळाची विक्री, जाणून घ्या

अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या घडयाळाची इतक्या कोटींना विक्री, किंमत एकून थक्क व्हाल

Updated: Aug 8, 2022, 01:46 PM IST
ज्यू नेत्यांचा आक्षेप...तरीही इतक्या कोटींना हिटलरच्या घडयाळाची विक्री, जाणून घ्या  title=

नवी दिल्ली : जर्मन हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर त्याच्या क्रुर वागणूकीमुळे म्हणजेच हिटलरशाहीमुळे अनेकांना माहित आहे. सध्या हिटलरच्या अनेक जवळच्या गोष्टीचा लिलाव करण्यात येत आहे.यामध्ये हिटलर नेहमी त्याच्या हातात घालणाऱ्या घड्याळाच लिलाव करण्यात आला.या लिलावात नेमका वाद काय झाला होता? तसेच हे घड्याळ नेमके किती किमतीला विकले गेले होते? ते जाणून घेऊयात. 

घड्याळाचा इतिहास काय ?
लिलाव कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे घड्याळ हिटलरला त्याच्या 44 व्या वाढदिवसाला गिफ्ट
मिळाले होते. इतिहास तज्ञांनी घड्याळाची सत्यता तपासली होती आणि त्यांच्या तपासणीत ते बरोबर असल्याचे आढळले. 4 मे 1945 रोजी फ्रेंच सैनिकांच्या एका गटाने हिटलरच्या बर्घोप येथील घरावर हल्ला केला होता. त्यानंतर त्यांनी तेथून या घड्याळाची लूट केली होती. आता हे घड्याळ ताब्यात घेण्यात आले असून त्याचा लिलाल करण्यात आला. 

आक्षेप काय?
घड्याळाच्या लिलावावर ज्यू नेत्यांनी आणि इतर काहींनी तीव्र आक्षेप घेतला होता.  घड्याळाचे कोणतेही ऐतिहासिक मूल्य नसल्याचे मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तांत म्हटले आहे. चेसापीक शहरातील या ऐतिहासिक वस्तूंचा लिलाव करणाऱ्या अलेक्झांडर हिस्टोरिकल ऑक्शनने या घड्याळाचे ऐतिहासिकदृष्ट्या दुसऱ्या महायुद्धाचे अवशेष म्हणून वर्णन केले आणि त्याची किंमत 2 दशलक्ष ते 4 दशलक्ष डॉलर दरम्यान ठेवली.

घड्याळाची किंमत किती? 
हिटलरच्या घड्याळाचा अमेरिकेत ११.१ दशलक्ष डॉलर्समध्ये लिलाव झाला. हा लिलाव अमेरिकेतील मेरीलँड येथे अलेक्झांडर हिस्टोरिकल ऑक्शनने आयोजित केला होता. हे घड्याळ एका अज्ञात व्यक्तीने विकत घेतले आहे.