चंद्रग्रहणासोबतच आज आभाळात दिसणार रहस्यमयी Flower Moon; समजून घ्या याचा अर्थ

Flower Moon 2023 : निसर्गाच्या किमया पाहता तो आपल्याला नेमका कधी थक्क करेल याबद्दल काहीच शाश्वती देता येत नाही. ग्रह ताऱ्यांची चाल, त्यांची स्थितीसुद्धा एखादा दुर्मिळ योग साधते आणि त्यातून समोर येतं रहस्यमयी वास्तव...

सायली पाटील | Updated: May 5, 2023, 08:55 AM IST
चंद्रग्रहणासोबतच आज आभाळात दिसणार रहस्यमयी Flower Moon; समजून घ्या याचा अर्थ title=
(छाया सौजन्य- नासा)/ flower moon 2023 Meaning date and time in india lunar eclipse Chandra grahan

Flower Moon 2023 : खगोलशास्त्रामध्ये काही अशा व्याख्या आहेत ज्याचा अर्थ उलगडताच आपण थक्क होतो. ग्रहतारेही किती रहस्यमयी असतात याचाच अंदाज इथं येतो आणि मग अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याची सुरुवात होते. यंदाचं हे वर्ष तुमच्या मनातील अशाच प्रश्नांना चालना देणार आहे. कारण, 2023 मध्ये खगोलशास्त्राच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या घटना घडणार असल्याची शक्यता आहे. शुक्रवार (5 मे 2023)चं चंद्रग्रहण त्यापैकीच एक.

चंद्रग्रहण असतानाही 5 मे रोजी (आज) चंद्र पूर्णाकृती असून, तो सहज दृष्टीक्षेपात येणारा असेल. या परिस्थितीला आणि खगोली. रचनेला पेनुमब्रल फ्लॉवर मून चंद्र ग्रहण असंही म्हणतात. आता तुम्ही म्हणाल हे काय नवं प्रकरण? चला जाणून घेऊया याचं उत्तर...

हेसुद्धा वाचा : Video Viral : किंकाळ्या, जीव मुठीत घेऊन पळणारे यात्रेकरू... केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला

सहसा चंद्र ग्रहणाचं हे ना वापरात नसल्यामुळं त्याबद्दल बरंच कुतूहल पाहायला मिळतं. Flower Moon म्हणण्यामागचं कारण म्हणजे, या काळात म्हणजेच मे महिन्याच्या सुमारास जगभरात बऱ्याच देशांमध्ये बहुविध प्रकारच्या फुलांना बहर येतो. त्यामुळं मे महिन्यातील पौर्णिमेला दिसणाऱ्या चंद्राला फ्लॉवर मून म्हणून संबोधलं जातं. चंद्राला हे नाव अमेरिकेतील नागरिकांनी दिलं असं सांगण्यात येतं.

ऋतुबदलांसाठी चंद्राला विविध नावं...

असं म्हणतात की अमेरिकेमध्ये असणाऱ्या विविध जातीजमात आणि प्रांतातील नागरिक ऋतुबदल लक्षात घेण्यासाठी चंद्राच्या या नावांचा वापर करतात. यंदाच्या वर्षी हा फ्लॉवर मून रात्री 11 वाजून 4 मिनिटांनी तुम्हीही पाहू शकता. याच काळात चंद्रग्रहणही असणार आहे. मे महिन्यातील या रहस्यमयी चंद्राला मिल्क मून, ब्राईट मून, हेर मून, ड्रॅगन मून, फ्रास्ट मून, बीवर मून अशीही नावं आहेत.

फ्लॉवर मून म्हणजे काय?

मे महिन्यातील पौर्णिमेपर्यंत अक फुलांना पूर्ण बहर आलेला असतो. त्यामुळं यादिवशी असणाऱ्या पूर्ण चंद्राला फ्लॉवर मून म्हणतात. वसंत ऋतूमध्ये बहरणाऱ्या खास फुलांमुळं चंद्राला हे नाव मिळालं आहे. यंदाच्या वर्षीचा हा Flower Moon अतिशय खास आहे, कारण, ग्रहणासोबतच हा दुर्मिळ योग साधला गेला आहे. त्यामुळं तुम्ही आजचा चंद्र पाहायला अजिबातच विसरु नका.

दरम्यान, यंदाच्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आशियायी देश, ऑस्ट्रेलिया, रशिया, आफ्रिकेचा पूर्व भाग, अंटार्क्टिका या भागांतून दिसणार आहे. उत्तर अमेरिका, युरोपच्या बहुंतांश भागातून हे ग्रहण पाहता येणार नसलं तरीही फ्लॉवर मूनची झलक मात्र पाहता येणार आहे.