Real-Life Vicky Donor: 57 मुलांचा बाप असलेल्या 'रियल-लाइफ विक्की डोनर'ची झाली विचित्र गोची

Real Life Vicky Donor: स्पर्म डोनेशनबद्दलचे आपले अनुभव शेअर करताना या तरुणाने आपण 57 मुलांसाठी 'बायोलॉजिकल फादर' असल्याचा खुलासा केला आहे. मात्र स्पर्म डोनेशनमुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यात निर्माण झालेल्या अडचणीबद्दलही त्याने भाष्य केलं आहे.

Updated: Jan 25, 2023, 04:19 PM IST
Real-Life Vicky Donor: 57 मुलांचा बाप असलेल्या 'रियल-लाइफ विक्की डोनर'ची झाली विचित्र गोची title=
Real Life Vicky Donor Kyle Gordy (Credit- Instagram Screengrab And Instagram/ kylegordy123)

Real Life Vicky Donor: स्पर्म डोनेशनच्या (Sperm donation) करारानुसार स्पर्म डोनेट करणारी व्यक्ती ही कायदेशीरदृष्ट्या किंवा बायोजॉलिकली त्या मुलाचा पालक म्हणून ओखळा जात नाही. केवळ स्पर्मचा वापर केला म्हणून त्या मुलावर भविष्यात स्पर्म डोनेट करणाऱ्यानी हक्क सांगू नये म्हणून स्पर्म डोनेशनबद्दल प्रचंड गुपत्ता पाळली जाते. अनेक प्रकरणांमध्ये स्मर्म डोनर हे याचा कोण वापर करणार आहे याबद्दलची माहिती नसते. त्यामुळेच जन्माला येणारं बाळ आणि त्याच्या कुटुंबासंदर्भातील जबाबदारी हे स्पर्म डोनरवर येत नाही. स्पर्म डोनर्सच्या चाचण्या करुन त्यांची जेनेटीक आणि फिजिकल माहिती डॉक्टर रेकॉर्डसाठी ठेवतात. मात्र ते या स्पर्मचा वापर करुन जन्माला आलेल्या मुलांबरोबरच डोनर्सची भेट घडवून आणण्याच्या वगैरे फंद्यात पडत नाहीत. कारण त्यामुळे डॉक्टरसुद्धा कायदेशीरदृष्ट्या अडचणीत येऊ शकतात.

57 मुलांचा बाप

मात्र जगातील काही स्पर्म बँका (Sperm Banks) या डोनर्सला त्यांचे स्पर्म कोणाला देण्यात आले याबद्दलची माहिती देतानाच त्यामधून जन्माला आलेल्या मुलांची भेट घेण्यासही परवानगी देतात. उदाहरण द्यायचं झालं तर केली गॉर्डीबद्दल (Kyle Gordy) सांगता येईल. केलीचे स्पर्म्स वापरुन 57 मुलांना जन्म देण्यात आला आहे. केलीने आपल्या करारामध्ये मुलांशी संपर्कात राहण्यासंदर्भातील नियमाचा समावेश केल्याने तो आपल्या या मुलांना भेटतो. मात्र आता स्पर्म डोनेशनमुळे झालेल्या 57 मुलांमुळे खऱ्याखुऱ्या आयुष्यात दिर्घकालीन रिलेशनशीपसाठी कोणतीही महिला जोडीदार आपल्याला होकार देत नाही, असं केलीचं म्हणणं आहे.

आपलं एक स्वप्न अपूर्ण

स्पर्म डोनेटरबद्दल भारतामध्ये बोलायचं झाल्यास डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो आयुषमान खुरानाचा (Ayushmann Khurrana) 'विक्की डोनर' (Vicky Donor) या चित्रपट. स्पर्म डोनेट करुन कुटुंबियांना संततीप्राप्तीसाठी मदत करणाऱ्या मुलाची कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. मात्र केली या चित्रपटात आयुष्मानने साकारलेल्या तरुणाच्या भूमिकेपेक्षा फार वेगळा आहे. केली हा प्रोफेश्नल स्पर्म डोनर आहे. आपण अनेक कुटुंबांना त्यांचं कुटुंब वाढवण्यासाठी स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून मदत करत आहोत, असं सांगताना केलीने एक खंत व्यक्त केली आहे. लोकांची स्वप्नं पूर्ण करताना आपलेच एका वैयक्तिक स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गात अडथळा येत असल्याचं केली म्हणाला आहे. 

अनेक महिलांचे मेसेज आले

आपल्या स्पर्म डोनेशन क्षेत्रातील प्रवासाबद्दल बोलताना केलीने, "स्पर्म डोनेशन सुरु करुन दोन वर्ष झाली आहेत. या काळामध्ये फार महत्त्व प्राप्त झालं. काही जणींच्या गर्भधारणा यशस्वी झाल्यानंतर मला इन्स्टाग्रामवरुन अनेकांचे मेसेज येऊ लगाले. यापैकी अनेक मेसेज हे महिलांचे होते, जे पाहून मला आश्चर्य वाटलं," असं सांगितलं. मात्र आता याच गोष्टीमुळे म्हणजेच स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून मिळालेल्या प्रसिद्धीमुळे केलीला जोडीदार मिळत नसल्याचंही त्याने सांगितलं.

जोडीदार मिळत नाही पण...

30 वर्षीय केलीने गंभीरपणे एखादं नातं सुरु करण्यात अडचणी येत आहेत असं मान्य केलं आहे. कॅलिफॉर्नियामध्ये राहणाऱ्या केलीने आतापर्यंत अनेक मुलींना डेट करण्याचा प्रयत्न केला असून यापैकी कोणालाही माझ्याबरोबर दिर्घकालीन रिलेशनमध्ये राहण्यात रस नसल्याचं सांगितलं. जोडीदार म्हणून आपल्याकडे पाहणाऱ्यांऐवजी आपल्या स्पर्मच्या माध्यमातून मुलांना जन्म देण्याची इच्छा असणाऱ्या माहिला माझ्याशी संपर्क करत आहेत, असं केली म्हणाला आहे.

महिला केलीला का प्राधान्य देतात?

अनेक महिला मला डोनर म्हणून प्राधान्य देण्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे त्या महिलांना त्यांच्या मुलांचा बायोलॉजिकल फादर म्हणजेच जन्मदाता वडील मुलांच्या आयुष्यात सक्रीयपणे सहभागी व्हावा असं वाटत असतं. मात्र सध्या 57 मुलांचा बायोजॉलिकल फादर असलेल्या केलीला यामध्ये रस नाही.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x