अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांना Facebook चा दे धक्का!

फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनीही वादग्रस्त धोरणाबद्दल सांगितले

Updated: Jun 9, 2021, 09:45 PM IST
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांना Facebook चा दे धक्का! title=

लंडन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते फेसबुकने दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे. कारण त्यांच्यावर लोकांमध्ये हिंसाचार पसरवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. तपासा दरम्यान असे आढळले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 जानेवारी रोजी कॅपिटल इमारतीवरील हल्ल्याआधी हिंसाचाराला प्रोत्साहन दिले होते. त्यामुळेच लोकांमध्ये भडका उडाल्याचे सामोर आले आहे. फेसबुकचे उपाध्यक्ष निक क्लेग यांनी शुक्रवारी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "या घटनेनंतर सार्वजनिक सुरक्षेचे धोके कमी झाले आहेत की, नाही हे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल."

फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनीही वादग्रस्त धोरणाबद्दल सांगितले की, कंपनी असा कोणत्याही गुन्हेगारीला पाठिशी घालत नाही. त्यामुळे ट्रम्प यांना हे धोरण लागू होते. फेसबुकने 6 जानेवारी रोजी ट्रम्प यांचे खाते 'अनिश्चित काळासाठी' बंद केले होते, ज्यामुळे ट्रम्प आता त्यांच्या खात्यावर कोणतेही पोस्ट करू शकत नाही.

जानेवारीत फेसबुकने ट्रम्प यांचे खाते बंद केले होते, तेव्हा फेसबुकने ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये हिंसाचार पसरवला आणि लोकांना भडकावण्याचे कारण दिले होते. त्यावर एएफबी ने सांगितले की, ट्रम्प यांना त्यांच्या पदामुळे या प्रकरणात कोणती ही सुटू दिली नाही किंवा यापुढेही देणार नाहीत. त्यामुळे ट्रम्प यांचा फेसबुक अकाउंट 7 जानेवारीपासून बंद केला आहे. जो दोन वर्षे म्हणजे 7 जानेवारी, 2023 पर्यंत बंद राहील.

फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग फेसबुकवर नेत्यांना काही दिलेल्या सुट पुन्हा काढून घेण्याचा विचार करत आहे. ज्यामुळे असा प्रकार भविष्यात पुन्हा घडणार नाही.