हा Face Mask करणार तुमची कोरोना टेस्ट; 90 मिनिटांत देणार रिपोर्ट

हा फेस मास्क बनवणाऱ्या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, या मास्कमध्ये एक बटन फिट करण्यात आलं आहे, जे एक्टिव्ह करताच कोरोना चाचणीची प्रक्रिया

Updated: Jul 10, 2021, 09:20 AM IST
हा Face Mask करणार तुमची कोरोना टेस्ट; 90 मिनिटांत देणार रिपोर्ट  title=

मुंबई : हार्वर्ड यूनिव्हर्सिटी Harvard University आणि एमआईटी (MIT) मधील वैज्ञानिकांनी स्वस्तातील एक फेस मास्क तयार केलाआहे.या मास्कचा वापर करुन  प्रत्येकाला आपली कोरोना चाचणी करता येणार आहे. आपला कोरोना रिपोर्ट जाणून घ्यासाठी या मास्कचा  वापर करता येणार आहे. 90 मिनिटांत आपला कोरोना  रिपोर्ट जाणून घेण्यासाठी हा मास्क मदत करणार आहे. 

हा फेस मास्क बनवणाऱ्या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, या मास्कमध्ये एक बटन फिट करण्यात आलं आहे, जे एक्टिव्ह करताच कोरोना चाचणीची प्रक्रिया  सुरु होणार आहे. आणि आपण आपला कोरोना रिपोर्ट मिळवून शकणार आहे. 

हा रिपोर्ट अवघ्या 90 मिनिटांत मिळू शकतो. ही टेस्ट पीसीआर टेस्ट म्हणून ओळखली  जाते. ही एक गोल्ड स्टॅंडर्ड टेस्ट समजली जाते.

या मास्कचा वापर करुन कोरोना रिपोर्ट मिळवण्यासाठी मोबाईलमध्ये एक अॅपलिकेशन घ्यावं लागतं, ज्याच्या माध्यमातून आपण आपला कोविड-19  रिपोर्ट पाहू  शकतो. मोठ्या प्रमाणात असे मास्क उत्पादित करण्यासाठी निर्मात्यांचा शोध सध्या सुरु आहे.

मास्क घालणाऱ्यांच्या श्वासांचा रिपोर्ट SARS-CoV-2 या बायो सेन्सरचा वापर करुन मिळवला जातो. या मास्कमध्ये वैज्ञानिकांनी काही फंक्शन फिट केले आहेत. जे  रिपोर्टची पुर्ण प्रोसेस करते आणि कोरोना अहवाल सादर करते.