ऐकावं ते नवलंच! 4 गर्लफ्रेंडला या माणसाने आणलं एकत्र, नेटकऱ्यांकडून बहाद्दराच्या हिंमतीचं कौतुक

WhatsApp : साच एक विचित्र आणि मजेशीर प्रकार समोर आला आहे. इथे एक प्रेयसी सांभाळणं कठीण असतं. त्यात जर तुमची एक्स गर्लफ्रेंड असेल तर तुमची काय हालत होते त्या त्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. आपण गर्लफ्रेंडसमोर कधीही एक्स गर्लफ्रेंडबद्दल ना बोलतो आणि तिला आणतो. अशातच एका महाशयाने जी हिम्मत दाखवली आहे, त्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.  

Updated: Nov 1, 2022, 03:05 PM IST

Girlfriends_WhatsApp_Group_Chat

Ex-Girlfriends WhatsApp Group Chat : आनंदाच्या भरात किंवा रागाच्या भरात कोण कधी काय करेल याचा कोणीही नेम लावू शकतं नाही. या सोशल मीडियाच्या (Social media) जगात कधी कुठे कुठली गोष्ट घडली की ती वाऱ्यासारखी पसरते. असाच एक विचित्र आणि मजेशीर प्रकार समोर आला आहे. इथे एक प्रेयसी सांभाळणं कठीण असतं. त्यात जर तुमची एक्स गर्लफ्रेंड असेल तर तुमची काय हालत होते त्या त्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. आपण गर्लफ्रेंडसमोर कधीही एक्स गर्लफ्रेंडबद्दल ना बोलतो आणि तिला आणतो. अशातच एका महाशयाने जी हिम्मत दाखवली आहे, त्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 

कमाल आहे बुवा!

आजकाल एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी आपण व्हॉट्स अँपचा वापर करतो. त्यावर नातेवाईक, ऑफिस मित्रमैत्रीणी, शाळे, कॉलेजमधील लोकांचा ग्रुप बनवतो. पण या पठ्ठ्याने एक नाही दोन नाही चार एक्स गर्लफ्रेंडचा व्हॉट्स अँप ग्रुप बनवला आणि मग काय जी धम्माल उडाली ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल. (Ex-Girlfriends WhatsApp Group Chat to wish them Merry Ex-Mas and Merry Christmas nmp)

बहाद्दराच्या हिंमतीचं कौतुक

टॉम असं या व्यक्तीचं नाव असून त्याने बेला, लिसा, स्टेफनी आणि जेमा या त्याचा एक्स गर्लफ्रेंडचा एक ग्रुप (Tom added his former girlfriends to a group chat) बनवला. या ग्रुप चॅटचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालतं आहेत. 

का केलं त्याने असं ?

तर जिगरबाज टॉमने (Tom) नाताळच्या शुभेच्छा (Merry Christmas) देण्यासाठी हा ग्रुप बनवला (WhatsApp group to wish them 'Merry Ex-Mas'.) होता. त्या ग्रुपवर त्याने एक मेसेज पण टाकला. ती म्हणाला की, या ग्रुपच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संपर्क ठेवू यात आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊयात. या वर्षी मी नाताळमध्ये एकटा आहे, असंही त्याने सांगितलं. लिसाला हा ग्रुप अजिबात आवडला नाही, तिने तो ग्रुप लगेचच लेफ्ट केला. (another left almost immediately)

तर जेमाला त्याला म्हणाली की, तू नशेत अशील म्हणून हे सगळं करत (one of them thought he was drunk) आहेस. बेला तर टॉमवर चांगलीच भडकली होती. त्या दोघांमध्ये इतर गर्लफ्रेंडसमोरच वाद झाला. दुसऱ्या मुलीसाठी आपली फसवणूक झाल्यामुळे ती भयंकर दुखावली होती. यानंतर बेला आणि स्टेफनीचाही या ग्रुपवर वाद झाल्याचं पाहिला मिळाले. 

शेवटी काय या पठ्ठ्याच्या हिम्मतीला दाद द्यायला हवी. आनंदाच्या भरात असो किंवा अजून काही...आपण स्वप्नातही कधी असा विचार करणार नाही तसं या महाशयाने केलं आणि आता त्याचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येतं आहे. खरंच ऐकावं ते नवलंच...