ज्याला पाकिस्तानी चांद्रयान म्हणवले जातेय तसे सॅटेलाईट आपल्याकडे लहान मुलं सुद्धा बनवतात

पाकिस्तानाचे मून मिशन सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पाकिस्ताम मून मिशनचे अपडेट समोर येत आहेत. पाकिस्तानचे चंद्रावर जाणारे सॅटेलाईट पाहून खिल्ली उडवली जात आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 3, 2023, 04:27 PM IST
ज्याला पाकिस्तानी चांद्रयान म्हणवले जातेय तसे सॅटेलाईट आपल्याकडे लहान मुलं सुद्धा बनवतात title=

Pakistan China Moon: भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर आता पाकिस्तान देखील चंद्रावर स्वारी करणार आहे. पाकिस्तान चीनच्या मदतीने आपले मून मिशन लाँच करणार आहे. पाकिस्तानचे चांद्रयान अर्थात सॅटेलाईटचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहून पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. ज्याला पाकिस्तानी चांद्रयान म्हणवले जातेय तसे सॅटेलाईट आपल्याकडे लहान मुलं सुद्धा बनवतात असं म्हणत नेटकरी पाकिस्तानच्या मून मिळनची थट्टा उडत आहेत. 

काय आहे पाकिस्तानचे मून मिशन?

चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (CNSA) या चीनी स्पेस एजन्सीच्या मदतीने पाकिस्तान आपले चांद्रायान लाँच करणार आहे. 2024 मध्ये चीन चांगई-6 हे मून मिशन लाँच करणार आहे. चांगई-6 हे मून मिशनच्या माध्यमातून आपलं सॅटेलाईट चंद्रावर पाठवणार आहे. इतर देशांप्रमाणे चंद्र मोहिम लाँच करणाऱ्या देशांच्या यादतीत आपले देखील असावे असा पाकिस्तानचा या मोहिमागचा उद्देश आहे. 

पाकिस्तानचे चांद्रयान म्हणजे लहान मुलांचे खेळणं?

पाकिस्तानच्या सॅटेलाईटचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.  चंद्रावर जाणाऱ्या पाकिस्तानच्या सॅटेलाईटचा फोटो पाहून सगळेजण खिल्ली उडवतं आहेत.   हे चांद्रयान आहे की लहान मुलाचं खेळण?  असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत. तर, आपल्याकडे लहान मुलं देखील असा सॅटेलाईट बनवतात... पाकिस्तानच्या या सॅटेलाईटच्या फोटोवर नेटकरी गमतीशीर कमेंट करत आहेत. 

डब्याच्या आकाराचे पाकिस्तानचे चांद्रयान

पाकिस्तानचे अतिशय सूक्ष्म यान चंद्रावर जाणार आहे. फोटोत पाहिले असता पाकिस्तानचे चांद्रयान हे छोट्याशा बॉक्सच्या आकाराचे आहे. साधारण 1x1 फूट आकाराचा हा चौकोनी बॉक्स आहे. हा बॉक्स म्हणजेच पाकिस्तानचे चांद्रयान आहे. पाकिस्तानच्या या चांद्रयानचे नाव क्यूबसॅट असे आहे. चीनच्या चांगई-6 हे मून मिशन अंतर्गत चीन Queqiao-2 किंवा Magpie Bridge-2 उपग्रह चंद्रावर पाठवणार आहे. चीनच्या या उपग्रहांसह पाकिस्तानचा क्यूबसॅट हा उपग्रह देखील अवकाशात झेपावणार आहे.

चीनच्या मून मिशनमध्ये पकिस्तानसह आणखी चार देशांचा सहभाग

चीनच्या मून मिशनमध्ये पकिस्तानसह आणखी चार देशांचा सहभाग असणार आहे. चांगई-6 हे मून मिशन मध्ये चीन चार देशांचे पेलोड आणि उपग्रह घेऊन जाणार आहे. फ्रान्सचे डोर्न रेडॉन डिटेक्शन इन्स्ट्रुमेंट, युरोपियन स्पेस एजन्सीचे निगेटिव्ह आयन डिटेक्टर, इटलीचे लेझर रेट्रोरेफ्लेक्टर आणि पाकिस्तानचे क्यूबसॅट्स अर्थता छोटे उपग्रह चीनच्या मदतीने अवकाशात झेपवणार आहेत.