Earthquake : जपानमध्ये भूकंपाचे जोरदार झटके, किनारपट्टी भागांना त्सुनामीचा इशारा

Earthquake in Japan : जपानमध्ये भूकंप झाला आहे. समुद्रात भूकंपाचं केंद्र आहे.

Updated: Mar 16, 2022, 09:54 PM IST
Earthquake : जपानमध्ये भूकंपाचे जोरदार झटके, किनारपट्टी भागांना त्सुनामीचा इशारा title=

टोकियो : जपान (Japan) मध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. उत्तर जपानच्या फुकुशिमाच्या तटावर बुधवार संध्याकाळी 7.3 तीव्रतेचा भूकंप (Earthquake) आला आहे. ज्यामुळे आता त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानच्या हवामान खात्याने माहिती दिली की, भूकंपाचं केंद्र समुद्राच्या 60 किलोमीटर खाली होते. हा भाग उत्तर जपानमध्ये येतो. जो 9 रिक्टर स्केलच्या भूकंपामुळे आणि त्सुनामीमुळे उद्धवस्त झाला होता. (Earthquake Hits Coast of Japan)

भूकंपामुळे आण्विक आपत्तीही आली आहे. भूकंपामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. समोर आलेल्या भूकंपाच्या व्हिडिओमध्ये जपान सुमारे 60 सेकंद हादरत असल्याचे दिसत आहे.

एएफपीने टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या हवाल्याने म्हटले आहे की, जपानमधील भूकंपानंतर सुमारे वीस लाख घरांची वीज गायब झाली आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री 11:36 नंतर काही भागांमध्ये त्सुनामीच्या लाटांचा इशारा देण्यात आलाय.