पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने घेतला चक्क कुत्र्याला चावा

जगात कधी, कुठल्यावेळी कोण काय करेल याचा काही नेम नाही... आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 25, 2018, 08:34 PM IST
पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने घेतला चक्क कुत्र्याला चावा title=
Hampshire Police dog (Image: Facebook)

ह्यूस्टन : जगात कधी, कुठल्यावेळी कोण काय करेल याचा काही नेम नाही... आजपर्यंत तुम्ही अनेक चित्र-विचित्र बातम्या ऐकल्या असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

आरोपीला पोलिसांनी केली अटक

अमेरिकेतील एका व्यक्ती कुत्र्याला चावल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बॉस्कावेन शहरात पोलीस एका गुन्हाबाबत तपास करत असताना या व्यक्तीने कुत्र्याला चावा घेतला. पाहूयात काय आहे नेमका प्रकार?...

रविवारी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी घडली आहे. या ठिकाणी एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आणि त्याचा तपास करण्यासाठी पोलीस बॉस्कावेन येथील एका घरात दाखल झाले. त्या घरात दोन व्यक्ती होते.

आरोपीने चक्क कुत्र्याला घेतला चावा

घरात उपस्थित असलेले हे दोघेही एका प्रकरणात आरोपी होते आणि पोलीस त्यांच्या मागावर होते. या प्रकरणी पोलिसांकडे अटक वॉरंटही होतं. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान एकाने चक्क कुत्र्याला चावा घेतला.

श्वानाचा गळा पकडत घेतला चावा

न्यू हॅम्पशायरमध्ये एका व्यक्तीने पोलिसांपासून बचाव करण्यासाठी कपड्यांच्या गठ्ठ्याखाली लपण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी पोलीस आपल्या श्वानासोबत दाखल झाले. आरोपीने याच श्वानाचा गळा पकडला आणि त्याच्या डोक्याला चावा घेतला.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल

आरोपीने अटक होण्यापासून आपला बचाव करण्यासाठी कुत्र्याला चावा घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी हॅम्पशायर पोलिसांनी फेसबुकवर एक पोस्ट करत कुत्र्याचा फोटोही शेअर केला आहे. या घटनेचेही सोशल मीडियात प्रचंड चर्चा होत आहे.