कोरोनामुक्त नागरीकांना 'हा' धोका, रुग्णाच्या धक्कादायक दाव्याने माजली खळबळ

कोरोना होण्यापुर्वी आपल्याला अनेक लक्षणे दिसत असतात. 

Updated: Jul 17, 2022, 08:05 PM IST
कोरोनामुक्त नागरीकांना 'हा' धोका, रुग्णाच्या धक्कादायक दाव्याने माजली खळबळ title=

मुंबई : कोरोना होण्यापुर्वी आपल्याला अनेक लक्षणे दिसत असतात. जसे तोंडाची चव जाते, वास घेता येत नाही, पाठदुखी अशी लक्षणे सर्वांनीच अनुभवली असतील. मात्र आता कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये एक वेगळचं लक्षण दिसून आलं आहे. कोरोनामुक्त झालेल्या नागरीकांचा प्रायव्हेट पार्ट लहान होतोय. एका रूग्णाने असा दावा केला आहे. या दाव्यानंतर मोठी खळबळ माजली आहे.  

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने नागरीकांचे जगणे असह्य केले आहे. 2020 ला आलेल्या कोरोनाने करोडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच असंख्य़ लोक या कोरोनामधून बचावलेही. सध्या अनेक देशात कोरोना नियंत्रणात आला आहे. देशातही कोरोनाची रूग्णसंख्या खालावली आहे. त्यामुळे नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अधूनमधून तो पून्हा एकदा डोकं वर काढत असल्याने नागरीकांची धाकधूक वाढली आहे.  

अमेरिकन व्यक्तीचा दावा काय?

मीडिया रिपोर्टनुसार, हाऊ टू डू इट नावाच्या पॉडकास्टवर अमेरीकन व्यक्तीने दावा केला होता की, गेल्या वर्षी जुलैमध्ये त्याला गंभीर कोरोना संसर्ग झाला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर, त्याला इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या जाणवू लागली.जे औषधांनी हळूहळू नाहीसे होऊ लागले. पण, इरेक्टाइल डिसफंक्शनमुळे, व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टची लांबी 1.5 इंच कमी झाल्याचे जाणवले. तसेच डॉक्टरांनी कोरोनामुळे व्हॅस्क्युलर डॅमेज (नसांचे नुकसान) प्रायव्हेट पार्ट लहान होण्यामागचे कारण सांगितले आहे.  

डॉक्टर काय म्हणाले?  
युरोलॉजिस्ट डॉ. चार्ल्स वेलिव्हर यांनी या दाव्याचे समर्थन केले आहे. त्यांच्या मते, कोविड संसर्गामुळे काही पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची प्रकरणे दिसून आली आहेत.ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टची लांबी लहान असू शकते. याउलट, कोरोनामुळे प्रायवेट पार्टवर ताण बराच काळ टिकून राहण्याची समस्या उद्भवू शकते आणि ती धोकादायकही ठरेल.