कोरोनावर आणखी एक औषध प्रभावी, रुग्णांच्या प्रकृतीत सुधार

कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे.

Updated: May 3, 2020, 04:29 PM IST
कोरोनावर आणखी एक औषध प्रभावी, रुग्णांच्या प्रकृतीत सुधार title=

वॉशिंग्टन : कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे. अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेत औषधांच्या वापरला परवानगी देणाऱ्या एफडीएने कोरोनाच्या उपचारांसाठी रेमेडीसिवर औषधाला परवानगी दिली आहे. अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जीस एण्ड इनफेक्शियस डिसीसने रेमेडीसिवर औषधाचा प्रयोग केला. कोरोनाच्या रुग्णांना हे औषध दिल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं हे औषध दिल्यानंतर समोर आलं.

रुग्णांची प्रकृती सुधारत असल्यामुळे अमेरिकेत या औषधाच्या वापराला परवानगी देण्याची मागणी जोर धरू लागली. रेमेडीसिवर एण्टीव्हायरल औषध आहे. या औषधाचा वापर इबोलाच्या उपचारांसाठीही झाला होता.

ज्याप्रकारे भारतात हायड्रोक्लोरोक्विनचे चांगले परिणाम दिसले होते, त्याच पद्धतीने अमेरिकेतही रेमेडीसिवर या औषधाचे चांगले परिणाम दिसल्याचा दावा केला जात आहे. असं असलं तरी जगात चांगली बाजारपेठ असल्यामुळे अमेरिकेतच बनणारं हे औषध चमत्कारी असल्याचा दावा अमेरिकन संशोधक करत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. भारतातल्या आयसीएमआरसह जगातल्या इतर देशांची नजरही या औषधाच्या प्रयोगावर आहे.

अमेरिकेमध्ये फेब्रुवारी महिन्यात या औषधाच्या प्रयोगाला सुरूवात झाली. अमेरिकेच्या वेगवेगळ्या ६८ भागांमध्ये १ हजार रुग्णांना हे औषध दिलं गेलं. अमेरिकेमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांनाच हे औषध दिलं जाऊ शकतं, कारण रेमेडीसिवर इंजक्शनमधून द्यावं लागत आहे. माईल्ड कोरोना असलेल्यांना हे औषध न देण्याचे आदेश अमेरिकेत देण्यात आले आहेत.