Corona Update : कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानं सारं जग चिंतेत सापडलंय. बहुतांश देशांनी आपल्या देशात अलर्ट जारी (Alert Notice) केलाय. अशातच कोरोनाबाबत (Corona) संशोधकांनी एक धक्कादायक अहवाल दिलाय. झोम्बीप्रमाणे (Zombie) कोरोनाचा प्रसार होऊ शकतो अशी भीती संशोधकांनी व्यक्त केलीय. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रूग्णाच्या मृतदेहापासून याची इतरांना लागण होऊ शकतो असाही दावाही या संशोधकांनी केलाय.
जपानच्या चिबा विश्वविद्यालयातील (Chiba University in Japan) संशोधकांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर (Variant) रिसर्च केला असून झोम्बी इन्फेक्शनप्रमाणे कोरोना व्हायरस पसरू शकतो असा दावा करण्यात येतोय. कोरोनाबाधित मृतदेहापासून हा व्हायरस इतरांमध्ये लगेच पसरतो आणि त्यामुळे मृत्यूचा धोका सर्वाधित असल्याचंही या अहवालात म्हंटलंय. धोका टाळण्यासाठी कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहापासून दूर राहावं असा सल्ला संशोधकांनी दिलाय.
चीनप्रमाणे जपानमध्येही कोरोना रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. यात कोरोना बाधित मृत व्यक्तीपासून संक्रमण झालेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सरकारनं गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. तुर्तास जपानमधील संशोधकांच्या अहवालावर WHOनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
केंद्र सरकार अॅक्शन मोडवर
कोरोना परतलाय आणि तो इतक्या घातक रुपात परतलाय की सरकार अॅक्शन मोडवर (Action Mode) आलंय. त्याच्याशी मुकाबला कसा करायचा त्यावर सुरू असलेली ही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची बैठक.. या बैठकीत उपस्थित असलेल्या प्रत्येकानं मास्क घातलाय. भविष्यात काय वाढून ठेवलंय, याचा अंदाज यावरून लावता येईल. देशात मास्कसक्ती पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना अजून संपलेला नाही, असं सांगत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाच्या सूचना केल्यायत.
गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा
ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घ्या
आजार असलेल्या लोकांनीही बूस्टर डोस घ्या
शाळा, कॉलेजेस, विद्यापीठं अलर्टवर
अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश
न्युमोनियाच्या रुग्णांची योग्य तपासणी करा
लक्षण असल्यास कोरोना टेस्ट करा
हे ही वाचा : Corona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, दररोज 10 लाख लोकांना होऊ शकते लागण
भारतामध्ये कोरोनाविरोधात लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात हर्ड इम्युनिटी निर्माण झालीय. तसंच लसीकरणही चांगल्या प्रमाणात झालंय.... पण तरीही कोरोना अजून गेलेला नाही. तो कुठल्याही क्षणी त्याचं आक्राळ-विक्राळ रुप दाखवायला सज्ज झालाय. त्यामुळे ख्रिसमस, न्यू इअर पार्ट्यांना आणि गर्दीच्या ठिकाणी जाताना खबरदारी घ्या. कपाटात ठेवलेले मास्क पुन्हा एकदा बाहेर काढा आणि वापरायला सुरुवात करा.