सावधान ! या विकाराच्या लोकांना लवकर होतो कोरोना

अमेरिकेच्या दोन मोठ्या संशोधन करणाऱ्या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

Updated: Mar 31, 2020, 02:04 PM IST
सावधान ! या विकाराच्या लोकांना लवकर होतो कोरोना title=

मुंबई : कोरोना व्हायरसव रोज नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत. (Coronavirus) चीनच्या वुहान शहरात झालेल्या एका अभ्यासात असं समोर आलं आहे की, एका विशिष्ट प्रकारच्या आजार असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण लवकर होते.  अमेरिकेच्या दोन मोठ्या संशोधन करणाऱ्या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) ने चीनच्या वुहान शहरात मृत्यू झालेल्या लोकांची माहिती गोळा केली. कोरोना झालेल्या लोकांमध्ये हृदयविकार असलेल्या लोकांचं प्रमाण अधिक होतं. ज्यांना हृदयविकार आहे अशा लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वैज्ञानिकांच्या अशा लक्षात आलं की, वुहानमध्ये मृत्यू झालेल्या लोकांपैकी ५१.२ टक्के लोकांना हृद्यविकार होता. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिंस युनिवर्सिटीमधील कार्डियो विभागाचे डॉक्टर एरिन मिकोस यांच्यामते फक्त हार्ट अटॅकलाच हृदय विकार म्हणत नाही. हृदयात नसा ब्लॉक होणे किंवा नस कापली जाणे याला देखील हृदयविकार म्हटलं जातं. 

ज्या कोरोना झालेल्या रुग्णांना हृदयविकार नव्हता अशा लोकांच्या मृत्यूचं प्रमाण फक्त ४.५ टक्के होतं. हृदयविकारामुळे कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
मागील तीन महिन्यात कोरोनामुळे ३७,८२० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर संपूर्ण जगात ७ लाखाहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे.