China Covid : कोरोनाच्या गूढ व्हॅरिएंटनं खळबळ; रस्ते, मॉल निर्मनुष्य

Corona Virus In China : कोरोना (Corona) आता त्याच्या अखेरच्या टप्प्यात असून या विषाणूचा प्रादुर्भाव जवळपास नाहीसाच झाला आहे, अशी माहिती समोर येत असतानाच या विषाणूनं पुन्हा एकदा सर्वांनाच धडकी भरवली आहे. 

Updated: Dec 16, 2022, 11:58 AM IST
China Covid : कोरोनाच्या गूढ व्हॅरिएंटनं खळबळ; रस्ते, मॉल निर्मनुष्य  title=
Corona Cases spike takes horrible turn in china beijing latest Marathi news

Corona Virus In China  : कोरोना (Corona) आता त्याच्या अखेरच्या टप्प्यात असून या विषाणूचा प्रादुर्भाव जवळपास नाहीसाच झाला आहे, अशी माहिती समोर येत असतानाच या विषाणूनं पुन्हा एकदा सर्वांनाच धडकी भरवली आहे. थोडक्यात 2019 च्या अखेरीस जगात थैमान घालण्यास सुरुवात केलेल्या या कोरोनाचं रौद्र रुप सध्या संपूर्ण जग पाहत आहे. (China Corona) चीनमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन चा एक गूढ व्हेरियंट झपाट्याने पसरत असल्यामुळे पुन्हा एकदा या प्रादुर्भावाचा उद्रेक झाला आहे. हाँगकाँगमधील शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार तब्बल 20 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

चीनची राजधानी असणाऱ्या बिजिंगमध्ये (beijing Corona) परिस्थिती गंभीर वळणावर पोहोचली आहे. रस्ते निर्मनुष्य झाले आहेत, इथं लोक एकमेकांना भेटणंही टाळत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सध्या प्राथमिक स्तरावर सरकारकडून प्रतिबंधात्मक नियमावली सक्तीनं लागू करण्यात आली आहे, असं असलं तरीही तिथंही अपयशच हाती लागलं आहे. 

बिजिंगमध्ये पहिल्यांदाच कोरोनाचं घातक रुप 

चीनच्या वुहानमधून (Wuhan) कोरोना जगभरात पसरला. पण, पहिल्यांदाच बिजिंगमध्ये त्याचं हे रौद्र रुप पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार 2021 नंतर कोरोनाच्या व्हेरिएंटमध्ये बरेच बदल झाले. ज्यानंतर त्याचे अनेक सबव्हेरिएंटही तयार झाले. आता असाच सवव्हेरिएंट BF.7  बिजिंगमध्ये हाहाकार माजवत आहे. सध्यातरी चीनमध्ये फोफावणारा हा नवा व्हेरिएंट घातक असला तरीही त्याचा संसर्ग चीनच्या बाहेर पोहोचू शकलेला नाही. 

BF.7 मुळे कितपत धोका? (BF.7 effects)

अभ्यासकांच्या मते कोरोनाचा BF.7  हा व्हेरिएंट अतिशय झपाट्यानं एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पसरत आहे. पण, दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण यातून फार कमी वेळातच सावरतही आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या आणि लस न घेतलेल्यांवरही या विषाणूचा प्रभाव पाहायला मिळत असून सध्या कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीसुद्धा या व्हेरिएंटपुढे अपयशी ठरत आहे. BF.7 च्या रुग्णांमध्ये त्याच लक्षणांची नोंद करण्यात आली आहे जी लक्षणं ओमायक्रॉनच्या रुग्णांणध्ये पाहायला मिळाली होती. 

हेसुद्धा वाचा : Google वर सर्वाधिक जास्त कोणते आजार आणि उपचार सर्च केले गेले, पाहा!

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणाऱ्यांना हा नवा व्हेरिएंट सहपणे निशाण्यावर घेत आहे. सध्याच्या घडीला बिजिंगमध्ये यामुळं परिस्थिती चिंताजनक असून, पुन्हा एकदा कार्यालयांना टाळी लागली आहेत. रेस्तराँ, रस्ते, मॉल कुठेही माणसांची वरदळ दिसेनाशी झाली आहे. इतकंच नव्हे, तर लोक एकमेकांना भेटणंही टाळत आहेत.