ATM @ 50, एटीएमधून पहिल्यांदा कोणी काढले पैसे, तुम्हाला माहीत आहे का?

रोजच्या व्यवहात पैशाला खूप महत्व आहे.  बॅंकिंग क्षेत्रात एटीएम मशिनने जागा घेतली आणि  शहरात, गावात पावला गणित कोणत्या ना कोणत्यातरी बॅंकेचे एटीएम मशिन नजरेत पडते. या एटीएमला आज ५० वर्षे पूर्ण झालीत. एटीएममधून सर्वात प्रथम कोणी पैसे काढले, हे तुम्हाला माहीत आहे का?

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 28, 2017, 12:07 AM IST
ATM @ 50, एटीएमधून पहिल्यांदा कोणी काढले पैसे, तुम्हाला माहीत आहे का? title=

लंडन : रोजच्या व्यवहात पैशाला खूप महत्व आहे.  बॅंकिंग क्षेत्रात एटीएम मशिनने जागा घेतली आणि  शहरात, गावात पावला गणित कोणत्या ना कोणत्यातरी बॅंकेचे एटीएम मशिन नजरेत पडते. या एटीएमला आज ५० वर्षे पूर्ण झालीत. एटीएममधून सर्वात प्रथम कोणी पैसे काढले, हे तुम्हाला माहीत आहे का?

एटीएमला आज ५० वर्षे पूण झालीत. मात्र, या एटीएमचा कोणी शोध लावला हे अनेकांना माहीत नाही. एटीएम कोणी बनवले? त्याचं भारताशी काय नातं? एटीएमधून पहिल्यांदा कोणी काढले पैसे, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर ही बातमी वाचल्यावर याचे उत्तर सापडेल. 

एटीएमचा (ATM) शोध जॉन शेफर्ड-बॅरेन यांनी लावला आहे. एटीएम मशीन तयार करणारे जॉनशेफर्ड-बॅरेन यांचा जन्म भारतामध्ये झाला. बॅरनचा जन्म २३ जून १९२५ रोजी शिलॉंगमध्ये झाला.

१९६७ मध्ये जगातील पहिल्या एटीएम मशीन लंडनमध्ये एका बँकमध्ये ठेवण्यात आली  होती. टीव्ही मालिका 'ऑन द बॉसज' च्या रेग वार्ने एनफिल्ड हे बारक्लेज बँकमधून पैसे काढणारे पाहिले होते. त्यांना त्यावेळी 'होल इन द वॉल' असे म्हटले जात होते.

लंडन एन्फिल्डमध्ये ५० वर्षांपूर्वी २७ जून १९६७ मध्ये जगातील पहिल्या एटीएम मशीन बार्कलेझ बँकेच्या शाखामध्ये बसविण्यात आली.  सुवर्ण जयंती निमित्त बँकेने सोन्याचे ATM मशीन बनवण्यात आले आहे.

अलिकडे  डिजिटल बँकिंग आणि कार्डद्वारे व्यवहार होत असतील तरी आज ही रोजच्या  खरेदी- विक्रीसाठी कागदी पैशांची गरज आहे.  सर्वात पहिली कॅश मशीन बनविण्यात बार्क्लेज़ची भूमिका मुख्य होती याचा आम्हाला आनंद आहे, असे बार्क्लेमध्ये कस्टमर एक्स्पिरिएन्सचे प्रमुख हॉल अहमद यांनी स्पष्ट केलेय.