लेबनाना : जगभरात ख्रिसमसची धूम सुरु आहे...ख्रिस्ती बांधवांचा हा सण असला तरीही प्रत्येकाला या सणाची उत्सुकता असते. त्यातही आकर्षक आणि रंगीबेरंगी लाईट्सने सजवलेलं ख्रिसमस ट्री सर्वांचं लक्ष वेधून घेत. लेबनान शहरातलं ख्रिसमस ट्री सध्या जगभरात गाजतं आहे.
उत्तरेच्या लेबनान मधल्या चेक्का गावातलं हे ख्रिसमस ट्री सध्या जगात चर्चेचा विषय बनलंय. आणि चर्चा होण्यासारखंच ख्रिसमस ट्री साकारण्यात आलं आहे. दुरुन जरी हे ख्रिसमस ट्री साधं वाटत असलं तरीही ते बनवण्यात आलं आहे ते प्लास्टिकच्या बाटल्यांपासून. जवळपास १ लाख २० हजार प्लास्टिकच्या बाटल्यांपासून २८.५ मीटर उंच असं हे ख्रिसमस ट्री साकारण्यात आलं आहे. २० दिवसांनंतर आकर्षक असं हे ख्रिसमस ट्री साकारलं आहे.
जवळपास सहा महिन्यांपासून या ख्रिसमस ट्रीची तयारी सुरु होती. यासाठी सोशल मीडियाच्या आधारे आम्ही नागरिकांना बॉटल फेकून न देता आमच्याकडे आणून देण्याचं आवाहन केलं होतं.
जवळपास दीड महिने हा ख्रिसमस ट्री नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार असून त्याला अधिक आकर्षक बनवण्यासाठी विविध रंगांचे लाईट्स लावण्यात आलेत. आहेत. विशेष म्हणजे या ख्रिसमस ट्रीची नोंद लवकरच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे.
गेल्यावर्षी मेक्सिकोमध्ये प्लास्टिक बाटल्यांचं ख्रिसमस ट्री बनवलं होतं. त्यावेळी त्यांनी ९८ हजार प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्या होत्या. यावेळ त्याचा विक्रम मोडला जाणार आहे.
पर्यावरणाचं रक्षण करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला असून या बाटल्याच्या पूर्नवापरातून येणारी रक्कम ही रेड क्रॉस संस्थेला सुपूर्द करण्यात येणार आहे.