मुंबई : कॅन्सर (Cancer) म्हटले की पोटात अक्षरश: पोटात भीतीचा गोळा येतो. जगभरात कॅन्सरच्या रुग्णसंख्येत वाढ होतेय. कॅन्सरग्रस्तांना केमो आणि रेडियो थेरपीसारख्या वेदनादायी उपचार पद्धतीला सामोरं जावं लागते. मात्र आता या वेदनेतून कॅन्सरग्रस्तांची सुटका होणार आहे. कारण येत्या दोन वर्षांमध्ये कॅन्सरवर लस (Cancer Vaccines) येणार असल्याचा दावा जर्मनीच्या संशोधकांनी दावा केला आहे.
बायोएनटेक कंपनीचे सीईओ डॉ. उगर साहिन आणि त्यांची पत्नी डॉ. ओझलेम टय़ुरेशी यांनी कोरोनावर फायजर लस तयार केलीय. ही लस सध्या अनेक देशांमध्ये वापरली जातेय. याच दांपत्याने आता कॅन्सरवरील लस शोधल्याचा दावा केला आहे. त्यांचा हा दावा खरा ठरला तर भविष्यात कॅन्सर (Cancer) वर तात्काळ उपाचर होऊ शकतात आणि कॅन्सरला कायमचे बाय बाय करता येणार आहे
कॅन्सर म्हटले की भीती वाटते. या आजारावर वेदनादायक उपचार असतात. या वेदनेतून कॅन्सरग्रस्तांची सुटका होणार आहे. कारण येत्या दोन वर्षांमध्ये कॅन्सरवर लस येणार असल्याचा दावा जर्मनीच्या संशोधकांनी दावा केला आहे. बायोएनटेक कंपनीचे सीईओ डॉ. उगर साहिन आणि त्यांची पत्नी डॉ. ओझलेम टय़ुरेशी यांनी कोरोनावर फायजर लस तयार केली आहे.
कॅन्सरवरील ही लस सध्या अनेक देशांमध्ये वापरली जात आहे. याच दाम्पत्याने आता कॅन्सरवरील लस शोधल्याचा दावा केला आहे. त्यांनी टय़ूमरविरोधात शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सक्षम करण्यावर यशस्वी संशोधन केले आहे. जर सगळं व्यवस्थित पार पडले, तर येत्या दोन वर्षांत कॅन्सरवर देखील लस उपलब्ध होईल असा दावा या दाम्पत्याने केला आहे. दुसरीकडे कोरोनावर लस तयार करणारे ऑक्सफोर्डचे संशोधक प्रा. सारा गिल्बर्ट आणि प्रा. एड्रियान हिल हेदेखील एम-आरएनए तंत्रावर आधारित कॅन्सरवरील लस तयार करत आहेत. फुप्फुसाचा कॅन्सर झालेल्या रुग्णांवर या लसीची चाचणी करण्याची तयारी त्यांनी पूर्ण केली आहे. या लसचे सुरुवातीला चांगले दिसून आले आहेत.