कॉलगर्लने पर्यटकाचा कान चावून खाऊनही टाकला, कुठे घडली धक्कादायक घटना

थायलँडमध्ये लोकं फिरायला, मजा मस्ती करायला जातात. मात्र, परदेशात जाऊन मजा मस्ती करणं हे एका पर्यटकाला चांगलंच महागात पडलं आहे

Updated: Aug 25, 2022, 06:28 PM IST
कॉलगर्लने पर्यटकाचा कान चावून खाऊनही टाकला, कुठे घडली धक्कादायक घटना title=

Prostitute call giril bites ear of tourist and eats it: बँकॉक: थायलँडमध्ये लोकं फिरायला, मजा मस्ती करायला जातात. मात्र, परदेशात जाऊन मजा मस्ती करणं हे एका पर्यटकाला चांगलंच महागात पडलं आहे. थायलँडमध्ये जाऊन एका पर्यटकाने आपला कान गमावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोणत्याही अपघातात नव्हे तर एका कॉलगर्लने नशेत या पर्यटकांचा कान जोरात चावल्याची घटना घडली आहे. या पर्यटकांचे वय 55 वर्ष आहे. ज्या कॉलगर्लने या पर्यटकांचा कान चावून चावला त्या कॉलगर्लचं नाव कनिका कामटन असल्याचं समजतंय. 

कॉलगर्ल आणि पर्यटकांची अशी झाली भेट

थायलँडमधील पट्टायामध्ये एक ओपन बस सिग्नलवर थांबली. तेंव्हाच ही महिला बसमध्ये चढली. या बसमध्येच पीडित माणसाची या महिलेसोबत ओळख झाली. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री या महिलेनं तिचं भयंकर रूप दाखवलं. या महिलेने या पर्यटकांचा उजवा कां चावून तोडला. यानंतर हा पर्यटक जोरजोरात ओरडू लागला. थरारक घटना तर तेंव्हा घडली जेव्हा या महिलेने त्या पर्यटकांचा कान चावून खाऊन टाकला. 

कॉलगर्लने केला पाळण्याचा प्रयत्न 

या पर्यटकाने तातडीने हालचाल करत पोलिसांना पाचारण केलं. दरम्यान या कॉलगर्लने पळण्याचाही प्रयत्न केला. मात्र तिला पकण्यात पोलिसांना यश आलं. यानंतर पोलिसांनी तिला स्थानिक पोलिसस्टेशनला नेण्यात आलं. सोबत पीडिती पर्यटकही पोलिसस्थानकात दाखल झाला. या पर्यटकांच्या कानातून पाण्यासारखं रक्त वाहत होतं. पोलिसांनी या पर्यटकांची मदत करत कानावर प्रथमोपचार केलेत. त्यानंतर त्याला दवाखान्यात पाठवण्यात आलं. 

मुलीने पोलिसांना मारली लाथ 

पोलीस या मुलीला ताब्यात घेण्यास आले तेंव्हा तिने पोलिसांना लाथा मारून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळतेय. या घटनेचे अनेक साक्षीदार आहेत. दरम्यान आता या मुलीवर खटला चालवला जाणार आहे. 

callgirl from thailand bites ear of tourist and eats that too danger incedent in pataya