चंद्रावरुन परतल्यानंतर बझ आल्ड्रिनही होते क्वारंटाईन...

Coronavirus कोरोना व्हायरसने जगभरात घातलेलं थैमान अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पण... 

Updated: Mar 30, 2020, 10:02 AM IST
चंद्रावरुन परतल्यानंतर बझ आल्ड्रिनही होते क्वारंटाईन...  title=
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसने जगभरात घातलेलं थैमान अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. चीनमागोमाग जगातील प्रत्येक देश कोरोनाशी लढा देत आहे. बहुतांश देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. परिणामी नागरिकांना क्वारंटाईन अर्थाच दीर्घ काळासाठी अलगीकरणात रहावं लागत आहे.

एकमेकांच्या फार संपर्कात न येता, एमकेकांमध्ये अंतर पाळत सावधगिरी म्हणूनच हे क्वारंटाईनचं पाऊल उचलण्यात आलं आहे. तीन आठवडे, सहा आठवडे, पंधरा दिवस अशा काळासाठी क्वारंटाईन होण्याचे निर्देश अनेक ठिकाणी प्रशासनाकडूनच देण्यात आले आहेत. घड्याळाच्या काट्यांवर धावणाऱ्या आयुष्याला वेगाला या क्वारंटाईनमुळे विराम लागला आहे. पण, क्वारंटाईनबाबतच एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहित आहे का? 

मुळात हा शब्द आजच चर्चेत आला आहे असं नाही. नील आर्मस्ट्राँग यांच्यासह चंद्रावर प्रथमच पाऊल ठेवणारे बझ आल्ड्रिन हेसुद्धा त्यांच्या या मोहिमेनंतर क्वारंटाईनमध्ये होते. त्यांनीच याबाबतचं एक ट्विट केलं आहे. 

'प्रत्येकजण क्वारंटाईनच्या या काळात त्यांचा वेळ कशा पद्धतीने व्यतीत करत आहे? अपोलो 11नंतर मीसुद्धा असाच एका सुरक्षित इमारतीमघ्ये जवळपास 3 आठवड्यांचा काळ व्यतीत केला होता. मोहिमेविषयीचा अहवाल लिहित, त्याची माहिती देत वगैरे पद्धतीने हा काळ व्यतीत केला होता. मला सांगा तुमच्यापैकी कितीजण घरी सुरक्षित आहात....', असं ट्विट आल्ड्रिन यांनी केलं. 

 

सोबतच त्यांनी एक फोटोही पोस्ट केला. त्यांच्या या फोटो आणि ट्विटची जोड त्यांना कोरोना व्हायरसच्या काळाती क्वारंटाईन काळाला दिली. अतिशय आव्हानात्मक अशा या दिवसांकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोनच जणू त्यांनी दिला. काय मग, विचार कसला करताय? चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या बझ आल्ड्रिन यांच्या प्रश्नाचं उत्तर देणार ना?