पारूस रहावं पण इतकं! रिलेशनशिपमध्ये राहिला पण खरं सत्य समोर आल्यावर ब्रायफ्रेंडने...

वाचा संपूर्ण प्रतकण नक्की काय झालं...

Updated: Oct 24, 2022, 05:09 PM IST
पारूस रहावं पण इतकं! रिलेशनशिपमध्ये राहिला पण खरं सत्य समोर आल्यावर ब्रायफ्रेंडने... title=

मुंबई : जेव्हा आपण एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतो तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दलची प्रत्येक छोटी गोष्ट जाणून घ्यायची असते. अनेक वेळा जोडीदाराच्या चुकांकडे दुर्लक्ष करूनही लोक नाते पुढे नेतात, पण ही गोष्ट जर आपल्या मूलभूत स्वच्छतेशी निगडित असेल तर कधी-कधी ती सहन करणे कठीण होऊन जाते. असेच काहीसे एका पुरुषासोबत घडले, जेव्हा त्याला कळले की त्याची गर्लफ्रेंड रोज अंघोळही करत नाही.

Reddit वर घडलेल्या घटनेचा संदर्भ देत एका मुलाने सांगितले की, त्याच्या गर्लफ्रेंडच्या एका सवयीने त्याला आश्चर्य वाटले. ज्या मुलीसोबत तो गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता, तिच्या घरात तो शिफ्ट झाला तेव्हा ती मुलगी दोन आठवड्यातून एकदाच आंघोळ करत हे कळल्यानंतर त्याला धक्का बसला.

याविषयी सांगताना तो म्हणाला, तो त्याच्या गर्लफ्रेंडवर खूप प्रेम करतो पण जेव्हा तो लिव्ह इनमध्ये राहायला तिच्या घरी शिफ्ट झाला, तेव्हा त्याला एक विचित्र गोष्ट कळली. त्याची गर्लफ्रेंड दोन आठवड्यातून एकदाच आंघोळ करते. तिच्या या वाईट सवयीमुळे त्रासलेल्या त्याने वेगळ्या बेडवर झोपण्यास सुरुवात केली. कारण त्याला तिच्यासोबत ब्रेकअप करायचं नाही पण त्याला तिची ही सवय आवडत नाही. तिच्यासोबत राहण्याआधी त्याला या सवयीची कल्पना नव्हती.

मुलाने सांगितले की, त्याने ही सवय काही महिने सहन केली पण एके दिवशी त्याने ठरवले की, तो आता एकाच बेडवर झोपू शकत नाही कारण त्याला वास सहन करणे कठीण जात आहे. जेव्हा त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला शांतपणे हे सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती  रागाने ओरडू लागली. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना लोकांनी हे योग्य नसल्याचे सांगितले. एका नेटकऱ्यानं लिहिले की, रोज आंघोळ न करणे किळसवाण आहे.